UGC NET 2022: UGC NET दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले! परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं होणार

UGC NET 2022: NTA म्हणते की या तारखेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारची परीक्षा शेड्युल (Schedule Of UGC NET 2022) केलेली आहे. आता या दोन विषयांच्या परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

UGC NET 2022: UGC NET दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले! परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं होणार
UGC NET 2022Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 6:56 AM

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC NET परीक्षा आज, 09 जुलै 2022 पासून सुरू होत आहे. पण काल, 08 जुलै रोजी, परीक्षेच्या एक दिवस आधी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर एक नोटीस जारी केली आहे. यामध्ये दोन विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली आहे. UGC NET चे हे दोन पेपर आज 09 जुलैला घेण्यात येणार होते. उर्वरित सर्व विषयांसाठीच्या (UGC NET 2022) UGC NET परीक्षा 2022 नियोजित तारखेला आणि वेळेत घेतली जाईल. ज्या विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत ते मराठी (विषय कोड 27) आणि तेलुगू (विषय कोड 38) आहेत. UGC NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 (UGC NET परीक्षा) साठी या दोन्ही विषयांची परीक्षा आज 09 जुलै 2022 रोजी होणार होती. NTA म्हणते की या तारखेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारची परीक्षा शेड्युल (Schedule Of UGC NET 2022) केलेली आहे. आता या दोन विषयांच्या परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. NTA ने नोटीसमध्ये सांगितले आहे की, UGC NET मराठी आणि तेलुगु परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. या संदर्भात ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.

UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करा

NTA UGC NET प्रवेशपत्र 2022 अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी NET परीक्षेचा फॉर्म भरला आहे, त्यांनी त्यांचे राष्ट्रीय पात्रता चाचणी प्रवेशपत्र (NTA NET Admit Card) डाउनलोड करावे. याची थेट लिंक या बातमीत पुढे देण्यात आली आहे. तुम्ही तुमचा UGC NET अर्ज क्रमांक, परीक्षांची तारीख आणि स्क्रीनवर दिसणारी सुरक्षा पिन टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

UGC NET 2022 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

NTA ने जारी केलेल्या UGC NET 2022 च्या वेळापत्रकानुसार, सहाय्यक प्राध्यापक आणि JRF परीक्षा 09, 11 आणि 12 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. यानंतर 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी नेट परीक्षा घेतली जाईल. कोविडमुळे उशिरा झालेल्या सत्रामुळे, ATA कडून मागील वेळेपासून एकाच वेळी दोन टप्प्यात परीक्षा घेतल्या जात आहेत. यावेळी प्रमाणेच UGC NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 च्या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जात आहेत. परीक्षा CBT मोडवर म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.