UGC NET विषयनिहाय डेटशीट जाहीर, जाणून घ्या

UGC NET परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. UGC NET डिसेंबर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे, हे उमेदवारांना पाहता येणार आहे. UGC NET परीक्षेचे वेळापत्रक तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

UGC NET विषयनिहाय डेटशीट जाहीर, जाणून घ्या
Exam
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 3:22 PM

UGC NET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खास आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET डिसेंबर परीक्षेसाठी विषयनिहाय डेटशीट जाहीर केली आहे. त्यामुळे कोणत्या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे, हे उमेदवारांना पाहता येणार आहे. UGC NET परीक्षेचे वेळापत्रक तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे. पुढे विस्ताराने वाचा.

UGC NET परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रिया 19 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना यासाठी अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबरपर्यंत मुदत होती. आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. खाली दिलेल्या स्टेप्ससह परीक्षेचे वेळापत्रक तपासा.

UGC NET परीक्षेचे वेळापत्रक कसे तपासावे?

UGC NET च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या ugcnet.nta.ac.in. होम पेजवर दिलेल्या UGC NET 2024 डिसेंबर परीक्षेच्या तारखेच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक पीडीएफ दिसेल. आता विषयनिहाय परीक्षेची तारीख तपासून प्रिंटआऊट घ्या.

UGC NET परीक्षा कधी होणार?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, असिस्टंट प्रोफेसर पात्रता आणि पीएचडीप्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार असून, पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे.

UGC NET परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर परीक्षेची तारीख: 1 जानेवारीपासून 19 जानेवारी 2025

UGC NET परीक्षेची पात्रता काय आहे?

UGC NET परीक्षेची पात्रता काय आहे? याचंच उत्तर आम्ही देत आहोत की, उमेदवाराकडे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा निकष 50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते?

PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते? याचं प्रश्नाचं उत्तर पुढे वाचा. नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.