सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय, 2.94 लाख कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी दिली. सर्व शिक्षा अभियानासाठी किंमत 2.94 लाख कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलीय.

सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय, 2.94 लाख कोटी रुपयांची तरतूद
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 6:22 PM

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी दिली. सर्व शिक्षा अभियानासाठी किंमत 2.94 लाख कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलीय. ही योजना 2021 पासून मार्च 2026 पर्यंत लागू असेल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शिक्षा अभियान 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व शिक्षा अभियान 2.0 वर 2.94 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. 2.94 लाख रुपयांमध्ये केंद्राचा हिस्सा 1.85 लाख कोटी रुपये असेल.

11 लाख शाळांचा अभियानात समावेश

सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 11.6 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा, 15.6 कोटी मुले आणि 57 लाख शिक्षक कक्षेत येतील. सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील काही वर्षांमध्ये, बाल वाटिका, स्मार्ट वर्गखोल्या, प्रशिक्षित शिक्षकांची टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये व्यवस्था केली जाईल आणि पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आणि सर्जनशील शिकवण्याच्या पद्धती विकसित केल्या जातील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

सर्व शिक्षा अभियानाच्या विस्तारामध्ये शाळांमध्ये सर्वसमावेशक आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये एक भाग म्हणून वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांच्या विकासासाठी लक्ष देण्यात येईल. शिक्षण मंत्री म्हणाले की, या अंतर्गत टप्प्याटप्प्याने प्ले स्कूल उभारण्याबरोबरच शैक्षणिकसाहित्य तयार केले जाईल, तसेच स्मार्ट वर्गखोल्यांचीही व्यवस्था केली जाईल.

सर्व शिक्षा अभियानाची व्याप्ती वाढविताना, विशेष सहाय्याची गरज असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र मानधनाची तरतूद, शिकण्याच्या प्रक्रियेवर देखरेख, शिक्षकांची क्षमता वाढवणे आणि प्रशिक्षण कार्य यावर विशेष लक्ष दिले जाईल, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. सर्व शिक्षा अभियानांअंतर्गत कस्तुरबा गांधी कन्या शाळांची व्याप्ती आणि श्रेणीसुधारणे आणि ‘सर्व’ रिपोर्ट कार्डची प्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत सर्व शिक्षा अभियानाला मुदतवाढ देण्यात येत असल्याचं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

इतर बातम्या:

CBSE Pass Percentage 2021 Class 10: सीबीएसईचा दहावीचा निकाल 99.04 टक्के, त्रिवेंद्रमनं मारली बाजी, पुणे कितव्या स्थानावर?

Maharashtra HSC Result 2021 LIVE Updates: बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला, दिनकर पाटील यांची माहिती

Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026 approved 2.94 lakh crore said by Dharmendra Pradhan

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.