Ayan Gupta : थक्क करुन सोडलं, वयाच्या 10 व्या वर्षी 10 वी परीक्षेत पास होऊन मुलाने रचला इतिहास
Ayan Gupta : भल्या-भल्यांना जमत नाही, ते या मुलाने करुन दाखवलं. आज अनेकांना अयानने मिळवलेल्या यशाच आश्चर्य वाटतय. या मुलाने ही कमाल कशी केली? हाच अनेकांच्या मनात प्रश्न आहे.
ग्रेटर नोएडा : वयाच्या 10 व्या वर्षी कुठला मुलगा 10 वी ची परीक्षा पास होऊ शकतो का? हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण एका 10 वर्षाच्या मुलाने हा कारनामा करुन दाखवलाय. ग्रेटर नोएडा येथे रहाणारा अयान गुप्ता नावाचा मुलगा वयाच्या 10 व्या वर्षीच 10 वी च्या परीक्षेत पास झालाय. या मुलाने वयाच्या 10 व्या वर्षी 10 ची परीक्षा उर्तीण होऊन इतिहास रचलाय. काल यूपी बोर्डाने 10 वी आणि 12 वी परीक्षेचे निकाल जाहीर केले. यात 10 वी च्या परीक्षेत अयानला 77 टक्के गुण मिळालेत.
अयानच हे यश पाहून कुटुंबियांमध्ये आनंदाच वातावरण आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी घरी लोकांची रांग लागलीय.
जास्त अभ्यासाची सवय
कोरोना काळात शाळा बंद होत्या. मुल घरातच आपला अभ्यास करायची. त्यावेळी अयानच अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नव्हतं. अयान त्यावेळी ग्रेटर नोएडाच्या ग्रेटर वॅली शाळेमध्ये शिकत होता. अयान आधीपासूनच अभ्यासात हुशार आहे. शाळेत जे शिकवलं जात होतं, त्यापेक्षा जास्त अभ्यास त्याने घरातच पूर्ण केला होता.
कुठे शिकला?
त्याची अभ्यासातील गती पाहून कुटुंबीयांनी घरातच त्याला चांगला होम क्लासेसचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्याला सातवी, आठवी आणि नववीच्या वर्गासाठी होम क्लासेस लावले. त्यात त्याने शानदार प्रदर्शन केलं.
थेट 10 वी त कुठल्या शाळेने प्रवेश दिला?
कोरोना काळ संपल्यानंतर अयानला सीबीएसईच्या शाळेत 9 वी वर्गात प्रवेश मिळवून देण्याची कुटुंबियांची इच्छा होती. त्याच वय कमी असल्यामुळे त्याला कुठल्याही सीबीएसई शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर अयानला बुलंदशहरच्या शिवकुमार अग्रवाल जनता इंटर कॉलेजमध्ये 10 व्या इयत्तेत प्रवेश मिळाला.
शाळेत जायचा नाही, मग अभ्यास कसा केला?
लॉकडाऊन दरम्यान अयानच अभ्यासात मन लागत नव्हतं. त्यामुळे त्याने पुढच्या इयत्तांचा अभ्यास सुरु केला. शिवकुमार अग्रवाल जनता इंटर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर अयान तिथे फक्त परीक्षा देण्यासाठी जायचा. अयानने त्याचं सर्व शिक्षण ऑनलाइन घेतलं होतं. अयानचे वडील काय करतात?
अयानचे वडील ग्रेटर नोएडमध्ये CA आहेत. 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान अयानने तो ज्या इयत्तेत होता, त्यापेक्षा पुढचा अभ्यास करुन ठेवला होता. अयानने वयाच्या 10 व्या वर्षी 10 वी ची परीक्षा पास करुन आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचा परिचय दिलाय.