upsc success story: मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी 20 लाखांचे कर्ज घेतले, मुलाने 28 लाखांची नोकरी सोडली, यूपीएससीची तयारी केली, निकाल आल्यावर…

upsc success story: आयुषचे वडील दिल्लीत किराणा दुकान चालवतात. त्यांच्या डोक्यावर 20 लाखांचे कर्ज होते. त्यानंतरही त्यांनी मुलाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दुसरीकडे आयुषने यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या नियोजनही काही कमी ठेवले नाही. तो कोणत्याही कोचिंगमध्ये गेला नाही.

upsc success story: मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी 20 लाखांचे कर्ज घेतले, मुलाने 28 लाखांची नोकरी सोडली, यूपीएससीची तयारी केली, निकाल आल्यावर...
आयुष सुभाषचंद्र गोयल
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 9:36 AM

जगातील सर्वात कठीण परीक्षेत संघ लोकसेवा आयोग (upsc) परीक्षेचा समावेश होतो. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या युवकांच्या यशोगाथा समोर येत आहे. दिल्लीत किराणा दुकान चालवणारे सुभाषचंद्र गोयल आनंदात आहे. कारण त्यांचा मुलगा आयुष याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्याने 28 लाख रुपये पॅकेज असणारी नोकरी सोडली. त्यावेळी शिक्षणासाठी घेतलेले 20 लाख रुपयांचे कर्ज कसे भरणार? हा प्रश्न त्याचे वडील सुभाषचंद्र गोयल यांना पडला होता. अखेर मुलाने यूपीएससी क्रॅक केल्यानंतर त्यांची चिंता मिटली अन् त्यांना आनंद झाला.

एमबीएनंतर 28 लाख रुपयांचे पॅकेज

यूपीएससी परीक्षेत 171 रॅक मिळवणारा आयुष हा केरळमधील कोझीकोड आयआयएममधून एमबीआय झाला. त्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली. त्याला 28 लाख रुपयांचे पॅकेज होते. यामुळे त्याच्या शिक्षणासाठी घेतलेल्या 20 लाख रुपये कर्जाची चिंता मिटली होती. परंतु नोकरी करुन सात महिनेच झाले होते. आयुषने नोकरी सोडली आणि घरात चिंता सुरु झाली.

नोकरी सोडण्याचा धक्कादायक निर्णय

आयुषचा नोकरी सोडण्याचा निर्णयावर वडिलांनी त्याला सांगितले की, 28 लाखांचे पॅकेज असताना नोकरी का सोडत आहे. आयुषने यूपीएससीची तयारी करणार असल्याचे सांगितले. त्याचे वडील म्हणाले, ही खूप कठीण परीक्षा आहे. रिस्क खूप जास्त आहे. आता नोकरी नाही तर कर्ज कसे फेडणार? परंतु आयुषने आपला निर्णय घेतला होतो. त्याच्या वडिलांनाही माहीत होते, आयुषने ज्या ठिकाणी पाऊल टाकले आहे, त्याला आतातपर्यंत यशच मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी चिंता सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

आयुष सुभाषचंद्र गोयल

कोणतीही कोचिंग लावली नाही

आयुषचे वडील दिल्लीत किराणा दुकान चालवतात. त्यांच्या डोक्यावर 20 लाखांचे कर्ज होते. त्यानंतरही त्यांनी मुलाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दुसरीकडे आयुषने यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या नियोजनही काही कमी ठेवले नाही. तो कोणत्याही कोचिंगमध्ये गेला नाही. घरी राहून 10 ते 12 तास अभ्यास केला. इंटरनेटवरील पुस्तके आणि UPSC संबंधित व्हिडिओ हा आयुषच्या तयारीचा महत्त्वाचा भाग होता. त्याच्या नोट्सही त्याने स्वतः तयार केल्या. आयुषचे एकच उद्दिष्ट होते – पूर्ण समर्पण आणि तयारीने UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे होय. अखेर त्याने परीक्षेत 171 रँक मिळवली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.