अनाथ आश्रमात शिकला, टोपल्या विकल्या; एक शिपाई असा बनला IAS अधिकारी

बिकट परिस्थितीत असलेले लोकंच यशाचे दार उघडतात हे अनेकदा खरे ठरले आहे. कारण कोणतीही सुख सुविधा नसताना देखील कठीण परीक्षा पास होण्यासाठी फक्त चिकाटी आणि मेहनतच कामाला येते. सर्व सुविधा असल्या तरी ते चालत नाही. अशीच एक प्रेरणा देणारी स्टोरी आहे एका आयएएस अधिकाऱ्याची.

अनाथ आश्रमात शिकला, टोपल्या विकल्या; एक शिपाई असा बनला IAS अधिकारी
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 10:06 PM

UPSC Success Story : लोकं अनेकदा आपल्या अपयशाचे श्रेय नशिबाला देत असतात. पण नशीब किंवा बिकट परिस्थितीतून देखील जे यशाची वाट शोधतात तेच लोकं या समाजात आपला ठसा उमटवतात. असेच एक उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उदाहरण आहे केरळचे रहिवासी मोहम्मद अली शिहाब यांचे. हे उदाहरण अनेकांसाठी नक्की प्रेरणा देणारे ठरेल. कारण शिहाब यांनी कोणतीही सुख सुविधा नसताना देखील आभाळा ऐवढं यश मिळवलं आहे. अभ्यासापासून दूर पळणाऱे विद्यार्थी अनेक कारणं सांगतात पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचे दार उघडते.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा या गावात जन्मलेले मोहम्मद अली शिहाब आज आयएएस अधिकारी आहेत. शिहाबचा यांचा जन्म एका गरीब घरात झाला. घरची परिस्थिती अतिशय कमकुवत होती. लहान वयातच त्यांना वडिलांसोबत बांबूच्या टोपल्या विकाव्या लागल्या. या कामातून ते घरचा उदरनिर्वाह चालवत होते. पण 1991 मध्ये प्रदीर्घ आजारानंतर शिहाब यांचे वडील जेव्हा हे जग सोडून गेले तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती.

वडिलांची सावली डोक्यावरून गेल्यानंतर शिहाबच्या छोट्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. शिहाबची आई शिकलेली नव्हती. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी कोणतेही काम मिळत नव्हते. त्यामुळे आईने शिहाबला अनाथाश्रमात पाठवले होते. तेथे अनाथ मुलांसह पोटभर जेवण मिळत होते. अनाथाश्रमाबाबत शिहाब सांगतो की, त्याच्यासाठी अनाथाश्रम वरदानापेक्षा कमी नाही. अनाथाश्रमात राहताना शिहाबचे लक्ष अभ्यासाकडे वळले.

21 सरकारी परीक्षा उत्तीर्ण

शिहाबने अनाथ मुलांसोबत राहून शिक्षण सुरु केले. असे 10 वर्षे ते या अनाथाश्रमात राहिले. शिहाब अभ्यासात हुशार होते.  शिहाब म्हणतात की, अनाथाश्रमातून मिळालेली शिस्त त्यांच्या आयुष्याची मांडणी करण्यास त्यांना खूप मदत करते. शिहाब यांना उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी सरकारी संस्थेच्या परीक्षेची तयारी केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे विविध सरकारी संस्थांनी घेतलेल्या 21 परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. या काळात त्यांनी वन विभाग, जेल वॉर्डन आणि रेल्वे तिकीट परीक्षक या पदांवरही काम केले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली.

आयएएस अधिकारी

यूपीएससीची यशोगाथा देखील अनेक अडचणींनी भरलेली होती. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नांत शिहाब यांना अपयशच मिळाले. पण हिंमत न हारता ते प्रयत्न करत राहिले. शेवटी ते वर्ष उजाडले जेव्हा एका गरीब घरात जन्मलेला मुलगा त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाला. शिहाबने 2011 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. अखिल भारतीय 226 वा क्रमांक त्यांनी मिळवला. इंग्रजीत फारसे चांगले नसल्यामुळे, शिहाबला मुलाखतीदरम्यान एका अनुवादकाची गरज होती, त्यानंतर त्याला 300 पैकी 201 गुण मिळाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.