Veergatha Awards 2022: वीरगाथा प्रोजेक्टमधील ‘टॉप 25’ विजेत्यांच्या नावांची घोषणा! संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार सत्कार
आदिशाला यावर्षी मिळणारा हा दुसरा पुरस्कार असणार आहे. यापूर्वी 26 जानेवरी रोजी तिच्या चित्राचा सुपर 25 मध्ये समावेश करण्यात आला होता आणि त्यासाठी तिला पुरस्कारही देण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुंबई: भारत सरकारतर्फे ‘वीर गाथा प्रोजेक्ट’ (Veergatha Project) ची सुरुवात करण्यात आली होती. याअंतर्गत देशातील ‘सुपर 25’ म्हणजेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच येत्या शुक्रवारी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnathsinha) यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती स्वदेशी सोशल मीडिया ‘कू’ ॲप (Koo) द्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. सुपर 25 (Super 25) विद्यार्थ्यांच्या यादीत कर्नाटकची अमृता, दिल्लीचा आरीव आणि उत्तराखंडच्या आदिशाची निवड करण्यात आली आहे. आदिशाला यावर्षी मिळणारा हा दुसरा पुरस्कार असणार आहे. यापूर्वी 26 जानेवरी रोजी तिच्या चित्राचा सुपर 25 मध्ये समावेश करण्यात आला होता आणि त्यासाठी तिला पुरस्कारही देण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘वीर गाथा प्रोजेक्ट’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान याचाही समावेश आहे.
कर्नाटकची अमृता
दिल्लीचा आरीव
उत्तराखंडची आदिशाने
‘वीरगाथा प्रोजेक्ट’
‘वीर गाथा प्रोजेक्ट’चे आयोजन केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे, शिक्षण मंत्रालय आणि MyGov यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. शौर्य पुरस्कार विजेत्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांची महती सांगण्यासाठीच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेता येतो. कविता, परिच्छेद लिखाण, निबंध, चित्रे आणि इंटरॅक्टिव्ह मल्टीमीडिया व्हिडिओ अशा वेगवेगळ्या विभागात विद्यार्थी आपले कौशल्य दाखवू शकतात.
‘सुपर 25’ विद्यार्थ्यांचा सन्मान
वीरगाथा स्पर्धेच्या सुपर 25 पर्यंत पोहोचलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय धाडस दाखवणाऱ्या जवानांबद्दल माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेली देशभक्तीची भावना अधिक प्रबळ व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.