JEE Mains : विद्यार्थ्यांची अडचण कमी होईना ! जेईईची परीक्षा आणि इतर प्रवेश परीक्षा एकाच कालावधीत, खासगी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची ‘ही’ अपेक्षा
सुधारित वेळापत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षेचे पहिले सत्र 20 ते 29 जून दरम्यान आणि दुसरे सत्र 21 ते 30 जुलै या कालावधीत होणार आहेत. पण आता याच कालावधीत खासगी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षाही आहेत.
मुंबई : जेईई मेन्स परीक्षेच्या (JEE Mains Exam) वेळापत्रकात आत्तापर्यंत तीन वेळा बदल (Change)करण्यात आलेत. वेळापत्रकातील शेवटचा बदल IIT च्या विद्यार्थ्यांच्या (Students) मागणीवरून करण्यात आला होता. इतकं सगळं करूनही जेईईच्या नवीन तारखा पुन्हा एकदा इतर प्रवेश परीक्षांशी जुळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालीये. सुधारित वेळापत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षेचे पहिले सत्र 20 ते 29 जून दरम्यान आणि दुसरे सत्र 21 ते 30 जुलै या कालावधीत होणार आहेत. पण आता याच कालावधीत खासगी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षाही आहेत. जेईईच्या तारखांमध्ये आता पुन्हा बदल होण्याची शक्यता कमी आहे. खासगी महाविद्यालये आता आपल्या प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलू शकतात अशी शक्यता वर्तविली जातीये.
जेईईच्या नवीन तारखा पुन्हा एकदा इतर प्रवेश परीक्षांशी जुळत आहेत
अभियांत्रिकीसाठी घेतली जाणारी राज्याची प्रवेश परीक्षा एमएचटी -सीईटी 11 ते 23 जून या तारखांमध्ये होणार आहे. याच दरम्यान जेईईच्या पहिल्या सत्राची परीक्षा आहे. जेईई मुख्य परीक्षेच्या दरम्यान बिट्स संस्थेच्या महाविद्यालयांसाठी होणारी परीक्षा होणार आहे. 20 जून ते 26 जून या दरम्यान या परीक्षेचं पहिलं सत्र होणार आहे. त्याचबरोबर 22 जून ते 26 जून या कालावधीत दुसरं सत्र होणार आहे. या सगळ्यात एसआरएम संस्थेच्या महाविद्यालयांसाठी होणारी एसआरएमजेईई परीक्षा देखील घेतली जाणार आहे. 25 आणि 26 जूनला ही परीक्षा घेतली जाणार आहे.
इतक्या वेळा जेईईच्या वेळापत्रकात या ना त्या कारणावरून बदल करून सुद्धा विद्यार्थ्यांची अडचण कमी होताना दिसत नाही. आता मात्र खासगी परीक्षांचं वेळापत्रक बदललं जावं अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
जेईईच्या नवीन तारखा
JEE (Main)dates rescheduled to enable students across the country to prepare well for the exams. @dpradhanbjp @EduMinOfIndia pic.twitter.com/QYABHnd7SC
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022
इतर बातम्या :