Interesting | वैभववाडीच्या बाजारात कॉलेजच्या मुली भाज्या का विकत होत्या? शिक्षा केली होती काय? नेमका काय प्रकार?

Viral Photo : या फोटोत सहा मुलींची एक ग्रूप आहे. त्यातील चार मुली भाजीचे वाटे करुन खाली बसून भाजी विकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. तर दोन मुली उभ्या आहेत. गावातीलच काही लोक या मुलींकडे भाजीच्या किंमतीबाबत चौकशी करताना दिसले आहे. या फोटोसह संतोष पाटील यांनी एक शंकाही उपस्थित केली.

Interesting | वैभववाडीच्या बाजारात कॉलेजच्या मुली भाज्या का विकत होत्या? शिक्षा केली होती काय? नेमका काय प्रकार?
फोटो - फेसबुकवर युजर संतोष पाटील यांच्या वॉलवरुन साभार
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 2:24 PM

सिंधुदुर्ग : भारतीय शिक्षण व्यवस्था कशी आहे, यावर बरीच वादग्रस्त चर्चा होऊ शकते. आधीची झालेली आहेच. तो फार गहन विषय आहे. त्यावर चर्चा करण्यापेक्षा चांगल्यापैकी प्रयोग राबवणाऱ्यांची चर्चा व्हायलाही आता सुरुवात झाली आहे. देसले गुरुजींच्या निमित्तानं ग्रामीण पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे शिक्षणाला मूर्त रुप प्रात्प करुन देण्यासाठी अनोखे प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशाच आशयाची एक फेसबुक पोस्ट सध्या समोर आली आहे. संतोष डी. पाटील यांनी फेसबुकवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कॉलेजमधील मुली चक्क भाजी विकताना दिसून आल्या आहेत.

काय दिसलं फोटोमध्ये?

संतोष पाटील यांच्या दाव्यानुसार हा फोटो कोकणातील सिंधुदुर्ग तालुक्यात असलेल्या वैभववाडीच्या बाजारातील आहे. या फोटोत सहा मुलींची एक ग्रूप आहे. त्यातील चार मुली भाजीचे वाटे करुन खाली बसून भाजी विकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. तर दोन मुली उभ्या आहेत. गावातीलच काही लोक या मुलींकडे भाजीच्या किंमतीबाबत चौकशी करताना दिसले आहे. या फोटोसह संतोष पाटील यांनी एक शंकाही उपस्थित केली होती. खरंतर हा फोटो पाहून कॉलेजच्या मुलींना भाजी विकण्याची कुणी शिक्षा केली आहे की काय, असं कुणालाही वाटेल. तशी चर्चाही गावातील बाजारात झाली नसेल, कशावरुन? पण वैभववाडीच्या गावठी बाजारात या मुलीनं नेमकी भाजी विकत का होत्या, ते हे देखील संतोष पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

काय लिहिलं फेसबुक पोस्टमध्ये?

संतोष पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की,…

आज (शनिवारी) वैभववाडी गावाठी बाजारात भाजी विक्रीकरताना काही कॉलेजच्या मुली दिसल्या. चौकशी अंती समजले फोंडाघाट येथील मराठे कृषि कॉलेजच्या विध्यार्थीनी आहेत. कृषी कॉलेजात शिक्षण घेत असताना प्रात्यक्षिकावेळी पिकवलेल्या भाजीची विक्री करायला त्या बसल्या होत्या.

त्यांच्या भाजीविक्रीच्या वेळी मला कुठेच फार्स दिसला नाही, केवळ फोटो साठी किंवा प्रोजेक्ट साठीचे नाटक नाही, बरोबर प्राध्यापक नाहीत, कॉलेज युवती असल्याचा अविर्भाव नाही. केवळ आणि केवळ भाजी पिकवताना घेतलेल्या मेहनतीचे फळ चाखाण्याची आसक्ती दिसली. ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागण्याची शैली दिसली, आपली भाजी काशी चांगली हे पटवून देण्याची कला दिसली, आणि कॉलेज युवतीचा चेहरा भाजी दुकाना बाहेर ठेऊन मराठमोळ्या शेतकऱ्याची मुलगी दिसली!

या विध्यार्थीनींचे आणि त्यांच्या कॉलेजचे कौतुक करायला हवे. कारण केवळ फोटो पुरते उपक्रम राबवून प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला दिसला . या विद्यार्थिनींच्या उपक्रमातून खऱ्या गरजेच्या शिक्षणपद्धतीचा कुठेणा कुठे वापर केला जातोय याची जाणीव झाली आणि मनस्वी आनंद झाला!

अनोख्या प्रयोगांचं कौतुक

संतोष पाटील यांची ही पोस्ट पाहून अनेकांनी हा प्रयोग आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. शनिवारी दुपारी संतोष पाटील यांनी ही पोस्ट केली आहे. गरजेची शिक्षण पद्धती………खऱ्या शिक्षणपद्धतीचा वापर, या मथळ्याखाली त्यांनी या प्रयोगाचं कौतुक केलं होतं. आतापर्यंत चारशेहून अधिक जणांना ही पोस्ट आवडली असून अनेकांनी ही पोस्ट शेअरही केली आहे. एकूणच या पोस्टमुळे खेड्यापाड्यातील वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, हे देखील यातून अधोरेखित होत असल्याचं पाहायला मिळालंय.

इतर बातम्या –

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!

Video | रेडा थेट आला अन् थेट हल्ला केला, रेस्टॉरंटमधील माणूस गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.