5 State Elections Date 2022 LIVE : उत्तर प्रदेश, गोव्यासह 5 राज्यांची मतमोजणी 10 मार्चला, मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील. त्यात उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभांचा समावेश आहे. ह्या पाच राज्यांकडे मिनि लोकसभा म्हणूनही पाहिलं जातंय. त्यामुळे देश महाराष्ट्राचं ह्या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे.
5 State Elections Date 2022 Live : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातल्या पाच राज्यांसाठी निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीय. यात सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा समावेश आहे. तसच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मनिपूर ह्या इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रकही जाहीर केलं. नव्या वर्षात ह्या पाचही राज्यात नवं सरकार असेल. उत्तर प्रदेशच्या निवडणूक वेळापत्रकाकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचही लक्ष आहे. कारण लोकसभेच्या यशाचा मार्गही याच राज्यातून जातो.
LIVE NEWS & UPDATES
-
मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा
महत्वाची घोषणा
- पाचही राज्यात 7 टप्यात मतदान
- गोवा, उत्तराखंड, पंजाबमध्ये एकाच टप्यात मतदान
- मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान
- पाचही राज्यांची मतमोजणी 10 मार्चला.
- गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान 10 मार्चला मतमोजणी
- मणिपूरमध्ये पहिला टप्पा 27 फेब्रुवारी दुसरा 3 मार्चला
- 10 फेब्रुवारीला यूपीत मतदानाचा पहिला टप्पा
- यूपीत एकूण 7 टप्यात मतदान होणार
- 14 फेब्रुवारीलाच पंजाब, उत्तराखंडमध्येही एकाच दिवशी मतदान
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
महत्वाची घोषणा
10 मार्चला पाच राज्यातली मतमोजणी एकाच दिवशी पूर्ण होणार
गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान 10 मार्चला मतमोजणी
पंजाब, उत्तराखंड, गोव्यात एकाच टप्यात मतदान
-
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
महत्वाची घोषणा
पाचही राज्यातली मतमोजणी 10 मार्चला
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
महत्वाच्या घोषणा
पंजाब, गोव्यातही एकाच टप्यात निवडणुका
मणिपूरमध्ये दोन टप्यात निवडणुका
14 फ्रेब्रुवारीला यूपीत दुसरा टप्पा
यूपीत तिसरा टप्पा 20 फेब्रुवारीला
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
महत्वाची घोषणा
रात्री 8 ते सकाळी 8 दरम्यान निवडणूक प्रचारावर पूर्णपणे बंदी
सात टप्यात होणार पाच राज्यांच्या निवडणूका
पंजाब, उत्तराखंडमध्ये एकाच टप्याच निवडणुका
यूपीत 10 फ्रेब्रुवारीला पहिला टप्पा
-
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
महत्वाची घोषणा
15 जानेवारीपर्यंत पदयात्रा, सायकल यात्रा, बाईक यात्रा
कॉर्नर सभा, रॅली, जनसभा यावर बंदी
निकालानंतर कुठलीही विजयी मिरवणूक काढता येणार नाही
डोअर टू डोअर कँपेनसाठी फक्त 5 जणांनाच परवानगी
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
मतदानाची वेळ एक तास जास्त असेल
राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त डिजिटल पद्धतीनं प्रचार करावा
40 लाखापर्यंत उमेदवार खर्च करु शकतात
रोड शो, पदयात्रा, बाईक यात्रावर बंदी
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
गोव्यात 95 लोकांचं वॅक्सिनेशन पूर्ण
यूपीत 90 टक्के लोकांना पहिला डोस घेतलाय
उत्तराखंडमध्येही जास्तीत जास्त लोक वॅक्सिनेटेड
उत्तराखंडमध्ये 90 टक्के लोकांना पहिला डोस
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
जेही अधिकारी निवडणूक ड्युटीवर असतील ते दोन डोस घेतलेले असतील
ज्यांना बुस्टर डोसची गरज असेल त्यांनाही तो दिला जाईल
बुथ पोलींग स्टेशन हे पूर्णपणे सेफ असतील
कोरोना महामारीतही सेफ निवडणूका होणार
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आधीच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची व्यवस्था केली आहे.
राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी अपलोड करणं बंधनकारक. तसंच उमेदवार निवडीचे कारणही द्यावे लागणार
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
उमेदवार ऑनलाईन अर्जही भरता येणार
निवडणूक आचारसंहिता वेळापत्रकाची घोषणा होताच अस्तित्वात येईल
सुविधा अॅपद्वारे विविध सुविधा पुरवल्या जातील
निवडणुकीतले घोटाळे रोखण्यासाठीही सुविधा अॅप
-
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा LIVE
बेकायदेशीर पैसे वाटप
दारु वाटप, ड्रग्ज वाटप यावर करडी नजर असेल
सर्व यंत्रणा अलर्टवर आहेत
सर्व पक्षांसाठी सुविधा अॅपची निर्मिती केली गेलीय
-
मुख्य निवडणूक आयुक्त LIVE
900 पर्यवेक्षक निवडणुकीवर लक्ष ठेवतील
पैशांचा दुरुपयोग कुठल्याच स्थितीत सहन केला जाणार नाही
सरकारी यंत्रणांचा वापर केला जाऊ देणार नाही
गोव्यात उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख
-
मुख्य निवडणूक आयुक्त LIVE
ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी पोस्टल व्होटींगची सोय
दिव्यांग आणि कोरोना प्रभावितांसाठीही पोस्टल व्होटींगची सोय
ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे त्यांची माहिती पब्लिश केली जाईल
पक्षांना त्यांच्या साईटवरही अशा उमेदवारांची नाव देणे बंधनकारक
-
मुख्य निवडणूक आयुक्त LIVE
24 लाखापेक्षा जास्त व्होटर वाढलेले आहेत
प्रत्येक विधानसभेत एक पोलिंग स्टेशन हे लेडीज स्पेशल असेल
1620 पोलींग स्टेशन हे लेडीज स्पेशल असतील
सगळ्या पोलींग स्टेशनवर व्हील चेअर असेल
-
मुख्य निवडणूक आयुक्त LIVE
यूपीत 29 टक्के मतदार पहिल्यांदा मतदान करतील
ग्राऊंड फ्लोअरवर पोलींग स्टेशन बनवले जातील
थर्मल स्कॅनिंगसह इतर सर्व सुविधा केल्या जातील
पोलींग स्टेशन कोरोनामुळे कमी करण्यात आलेत
-
मुख्य निवडणूक आयुक्त LIVE
18 कोटीपेक्षा जास्त लोक मतदान करणार
यात 8 कोटी पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे
यातच नौकरदार वर्गही आहे जो मतदान करेल
कोरोना नियम पाळून निवडणुका घेतल्या जातील
-
मुख्य निवडणूक आयुक्त LIVE
गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकांची तयारी
पूर्ण यंत्रणा त्यासाठी कामाला लागली होती
पाच राज्यातल्या 690 जागांसाठी मतदान होणार
विविध अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली गेली
-
मुख्य निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा प्रेस कॉन्फरन्सला संबोधीत करतायत
कोरोनाकाळात निवडणूका घेणे आव्हानात्मक
कोरोनाकाळातही निवडणुका घेणं हे आमचं कर्तव्य
-
विधानसभेचा कार्यकाळ कधी संपतोय?
उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपतोय
उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्चला संपतोय
पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्चला संपतोय
मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्चला संपतोय
गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्चला संपतोय
-
कोणत्या राज्यात किती जागा?
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत
उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत
पंजाबमध्ये 117 जागा आहेत
मणिपूरमध्ये 60 तर गोव्यात 40 जागांसाठी निवडणुकीची घोषणा होईल.
-
किती टप्यात मतदान होणार?
उत्तर प्रदेशात 6 ते 7 टप्यात मतदानाची शक्यता
पंजाब-उत्तराखंड-मणिपूरमध्ये दोन ते तीन टप्यात मतदानाची शक्यता
गोव्यात मात्र एकाच टप्यात मतदानाची शक्यता वर्तवली जातेय.
-
आज दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद
आज दुपारी साडे तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद जाहीर करण्यात आलीय. ह्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साडे तीन वाजताच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Published On - Jan 08,2022 1:42 PM