मध्य प्रदेशात ‘आप’ला मोठा झटका, सर्व 70 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

आम आदमी पक्षाला मध्य प्रदेशात सर्वात मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात आपच्या सर्व 70 उमेदवारांचा दारुण पराभव झालाय. त्यामुळे या सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे. विशेष म्हणजे काही मतदारांना तर नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

मध्य प्रदेशात 'आप'ला मोठा झटका, सर्व 70 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 9:13 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, भोपाल | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या चार पैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांकडे देशाचं विशेष लक्ष लागलेलं होतं. विशेष म्हणजे या तीनही राज्यांमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एकूण 200 उमेदवार उभे केले होते. आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशातील 70 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. राजस्थानमध्ये 88 उमेदवार तर छत्तीसगडमध्ये 57 जागांवर उमेदवार उभे केले होते. दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरातमध्ये यश संपादीत केल्यानंतर आम आदमी पक्ष या तीन राज्यांमध्ये यश मिळवतो का? हे पाहणं महत्त्वाचं होतं. पण यावेळी आम आदमी पक्षाला हवं तसं यश मिळालेलं नाही. विशेष म्हणजे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशातील आपच्या सर्व 70 उमेदवारांचा पराभव झालाय. या सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे.

या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती जागांवर यश मिळतं? याकडे राज्याचं लक्ष होतं. पण यापैकी अनेकांची डिपॉझिट जप्त झाली आहे. अनेक उमेदावारांना तर नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आता या निकालावर अरविंद केजरीवाल काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाला केवळ 0.50 टक्के मते

मध्य प्रदेशात भाजपला सत्ता ताब्यात ठेवण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाला केवळ 0.50 टक्के मते मिळाली आहेत. आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट करण्यात आली आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला 0.02 टक्के मते मिळाली. तर सपाला 0.46 टक्के मते मिळाली आहेत.

छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला 0.93 टक्के मते

निवडणूक आयोगाकडून आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला खातं उघडता आलेलं नाही. यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष, यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बसपा पक्ष, तर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सपा पक्षाला यश मिळालं नाही. या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला 0.93 टक्के मते मिळाली. छत्तीसगडमध्ये भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. भाजपने काँग्रेसच्या हातातून सत्ता हिसकावली आहे. तर इतर पक्षांच्या पदरात निराशा पडली आहे.

राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाला केवळ 0.37 टक्के मते

राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण ही सत्ता हिसकावण्यात भाजपला यश मिळालं आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला केवळ 0.37 टक्के मतं मिळाली आहेत. तर बसपा पक्षाला दोन जागांवर यश मिळालं आहे. तर सपाला अवघे 0.01 टक्के मतं मिळाली आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.