उत्पल पर्रिकरांपाठोपाठ पार्सेकरांचीही भाजपला सोडचिठ्ठी, अपक्ष म्हणून लढणार; ‘या’ मतदारसंघातून लढण्याची शक्यता

आज मी भाजपच्या सगळ्या बंधनातून मुक्त होणार असून अपक्ष म्हणून निवडणुक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

उत्पल पर्रिकरांपाठोपाठ पार्सेकरांचीही भाजपला सोडचिठ्ठी, अपक्ष म्हणून लढणार; 'या' मतदारसंघातून लढण्याची शक्यता
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 12:54 PM

गोवा – भाजपने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या पहिल्या यादीत (FIRST LIST) नाव न आल्याने नाराज आमदार आणि मंत्र्यांनी (MINISTER) भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिली आहे, त्यामुळे भाजपला होणारं पक्षांतर थांबवण कठीण होत आहे. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकरांनी (UTPAL PARRIKAR) भाजपला रामराम केल्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (LAXMIKAN PARSEKAR) यांनी सुध्दा भाजपला रामराम केला आहे. पक्षाने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिल्याने लक्ष्मीकांत पार्सेकर नाराज झाले आहेत.

आज मी भाजपच्या सगळ्या बंधनातून मुक्त होणार असून अपक्ष म्हणून निवडणुक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आज संध्याकाळपर्यंत भाजपच्या सदस्यत्वाचा आणि जाहीरनामा समिती प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे लक्ष्मीकांत पार्सेकर प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. मला पक्षाकडून पुर्नवसन नको आहे, तसेच माझा जनतेवर पुर्ण विश्वास असल्याने मी असा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या मतदार संघातून लढणार निवडणुक गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने ते पक्षश्रेष्ठी आणि भाजपच्या इतर नेत्यांवर नाराज झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे विधानसभा मतदार संघात आहेत इच्छुक असल्याची गोव्यात चर्चा आहे.

या नेत्यांनी केला मन वळवण्याचा प्रयत्न

पहिली यादी जाहीर झाल्यानंतर डावलले गेल्यामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे नाराज असल्याचे समजल्यानंतर गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांकडून मन वळविण्याचा प्रयत्न केला.

या दिवशी होणार मतदान – उत्तर प्रदेश – 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्चपर्यंत सात टप्प्यात मतदान होणार – उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार – पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होईल – मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीला आणि 3 मार्चला मतदान होईल सर्व राज्यांचे निकाल 10 मार्चला जाहीर होतील

Goa Assembly Elections 2022 : भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार? वाचा एका क्लिकवर

तर उत्पल पर्रिकरांच्या नाराजीचा गोव्याच्या राजकारणावर परिणाम होईल; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रीकरांवरून राऊतांनी पुन्हा डिवचले, फडणवीस समजूत काढण्यात पटाईत आहेत पण…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.