UP Assembly Election: AIMIM च्या उमेदवारांची यादी जाहीर, या उमेदवारांना मिळाली संधी
असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून डॉ. महताब को लोनी यांना गाझियाबाद आणि फुरकान चौधरी यांना हापुड, रफत खान यांना मेरठ, जीशान आलम यांना मेरठ, तस्लीम अहम मेरठ, अमजद अली यांना सहारनपुर, शाहीर रजा खान यांना बरेली, मरगूब हसन यांना (सहारनपुर) अशा पध्दतीने त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेश – असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) च्या AIMIM पक्षाकडून नुकतीच 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. (First List) पहिल्या यादीत असदुद्दीन ओवैसी यांनी 9 उमेदवारांना संधी दिली असून ते उमेदवार या ठिकाणी गाजियाबाद, हापुड, मेरठ, सहारनपुर आणि बरेली नशीब आजमावायचा प्रयत्न करतील.
असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून डॉ. महताब को लोनी यांना गाझियाबाद आणि फुरकान चौधरी यांना हापुड, रफत खान यांना मेरठ, जीशान आलम यांना मेरठ, तस्लीम अहम मेरठ, अमजद अली यांना सहारनपुर, शाहीर रजा खान यांना बरेली, मरगूब हसन यांना (सहारनपुर) अशा पध्दतीने त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांना तिकीट
काल भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांना तिकीट भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यादीत 63 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे. ज्या 107 उमेदवारांना भाजपने तिकीट दिलं त्यामध्ये 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिलांचा समावेश आहे. म्हणजे भाजपाने पहिल्या यादीत ओबीसी, एससी आणि महिला आदी 68 टक्के उम्मीदवारांना तिकीट दिलं आहे.
403 जागांसाठी रणसंग्राम उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
महत्त्वाचे उमेदवार शामली- तजेंद्र सिंह निर्वाल बुढ़ाना- उमेश मलिक चरथावल- सपना कश्यप पूरकाजी- प्रमोद ओटवाल मुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवाल खतौली- विक्रम सैनी मीरापूर- प्रशांत गुर्जर सिवालखास- मनेंद्र पाल सिंह सरदना- संगीत सोम हस्तिनापूर- दिनेश खटीक मेरठ कँट- अमित अग्रवाल किठोर- सत्यवीर त्यागी मेरठ- कमलदत शर्मा मेरठ साउथ- सोमेंदर तोमर छपरउली- सहेंद्र सिंह रमाला बड़ोत- केपी सिंह मलिक बागपत- योगेश धामा लोनी- नंदकिशोर गुर्जर मुरादनगर-अजीत पाल त्यागी साहिबाबाद- सुनील शर्मा