अपर्णा यादव यांची भाजपला पसंती, अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया
अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचं युपीत सरकार आल्यास नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.

उत्तरप्रदेश – समाजवादी पक्षाचे (SAMAJWADI PARTY) अखिलेश यादव (AKHILESH YADAV) यांनी नुकत्याचं घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपर्णा यादव (APRNA YADAV) यांच्याबाबत सांगितलं की, “मुलायम सिंह यादव यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत.”
दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या बैठकीनंतर अपर्णा यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये जाण्याच्या आगोदर त्यांना मुलायम सिंह यादव यांनी खूपदा समजावलं होतं. परंतु त्यांना जो निर्णय योग्य वाटला, तो त्यांनी घेतला असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे.
अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचं युपीत सरकार आल्यास नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. तसेच अति गरज असलेल्या महिलांना एका वर्षाला 18 हजार रूपये मिळतील. मागच्यावेळी अशा महिलांना 6 हजार देण्यात येत होते.
अखिलेश यांनी सुरूवातीला अपर्णा यादव यांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आमच्या पक्षाचा विस्तार होत असल्याने आम्ही खूष असल्याचे म्हणाले. तसेच आमची विचारधारा भाजपमध्ये सुध्दा असेल. मुलायम सिंह यांनी त्यांना खुप समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून हा निर्णय घेतला का ? या प्रश्नावर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, जनता म्हणेल त्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे.
अपर्णा यादव यांचा परिचय
त्याचं पुर्ण नाव अपर्णा बिष्ट यादव, त्या युपीतील सामाजिक आणि राजकीय नेत्या म्हणून प्रसिध्द आहेत. त्याच्यानंतर मुलायम सिंह यांच्या सुनबाई आहेत. 2011 मध्ये मुलायम सिंह यांच्या मुलाने अपर्णा यांच्यासोबत लग्न केलं. लखनऊ मधून 2017 ला त्यांना समाजवादी पार्टीकडून निवडणुक लढण्याची परवानगी देण्यात आली. त्यांनी आत्तापर्यंत महिलांच्या कामांना अधिक प्राधान्य दिले आहे.
नाव – अपर्णा बिष्ट यादव पक्ष – भाजप शिक्षण- पदव्युत्तर व्यवसाय- सामाजिक कार्यकर्ता वडिलांचे नाव- अरविंद सिंह बिश्त पतीचे नाव- प्रतीक यादव