Assembly Election Results 2022 LIVE Streaming: यूपी, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये कुणाचं सरकार बनणार?; TV9 वर असा पाहा निवडणुकांचा निकाल

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभेचा उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे. या निकालामुळे केवळ राजकीय पक्षांचा जय पराजयच दिसून येणार नाही.

Assembly Election Results 2022 LIVE Streaming: यूपी, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये कुणाचं सरकार बनणार?; TV9 वर असा पाहा निवडणुकांचा निकाल
यूपी, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये कुणाचं सरकार बनणार?Image Credit source: tv9 hindi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:42 PM

लखनऊ: उत्तर प्रदेश (UP Elections), उत्तराखंड (Uttarakhand Elections), मणिपूर (Manipur Elections) , गोवा (Goa Elections) आणि पंजाब विधानसभेचा (Punjab Assembly Elections) उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे. या निकालामुळे केवळ राजकीय पक्षांचा जय पराजयच दिसून येणार नाही. तर राजकीय पक्षांचं राजकीय भविष्यही ठरणार आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे, या राज्यात सपाची सत्ता येणार की पुन्हा भाजपचा भगवा फडकणार हे सुद्धा उद्याच स्पष्ट होणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता जाणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येतंय. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार या पाच पैकी काही राज्यात वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाच राज्याच्या निकालातून लोकसभा निवडणुकीचा अंदाजही स्पष्ट होणार आहे. उद्या 10 मार्च रोजी या पाचही राज्यांचे निकाल लागणार आहे. TV9 मराठीवर तुम्हाला या निकालाची झटपट माहिती मिळणार आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल

पाचही राज्यांच्या निवडणूक निकालाचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्हाला आमच्या चॅनेलवर पाहू शकता. तसेच www.tv9marathi.com या आमच्या संकेतस्थळावरही तुम्हाला निकाल पाहता येणार आहेत. तसेच टीव्ही9 मराठीचे ट्विटर अकाऊंट, फेसबुक पेज, युट्यूब चॅनेल आणि लाईव्ह टीव्हीवरही तुम्ही निकाल पाहू शकता. पाचही राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आकडेवारी, कितव्या फेरीत कोण पुढे आहे आणि कोण मागे आहे, बड्या नेत्यांच्या मतदारसंघात काय स्थिती आहे, कुणाला पराभवाचा धक्का बसला आणि कुणाच्या भाळी विजयाचा गुलाला लागला याची मिनिटा मिनिटांची अपडेट तुम्हाला वाचायला, पाहायला मिळणार आहे. उद्या 10 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच मतगणना सुरू होणार आहे. tv9marathi चे चॅनल आणि वेबसाईटवर तुम्हाला सकाळपासूनच प्रत्येक माहिती मिळणार आहे. अगदी तंतोतंत आकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या शिवाय तुम्हाला उत्तर प्रदेशाचं विशेष कव्हरेज पाहायचं असेल तर TV9 भारतवर्ष यूपी/उत्तराखंड वेब टीव्हीवर तुम्ही लाईव्ह पाहू शकता.

पार्थप्रतिम दास सांगणार अचूक निकाल

TV9 भारतवर्ष आणि TV9 मराठी उद्या मतमोजणीच्यावेळी इतिहास रचणार आहे. यावेळी पहिल्या राऊंडच्या मोजणीनंतर संभावित निकाल येणार आहेत. मीडिया इंडस्ट्रीत पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर डेटाचं विश्लेषण केलं जाणार आहे. पहिल्या राऊंडची मतमोजणीनंतरच पुढील निकालाविषयी भाष्य केलं जाणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात कुणाची सत्ता येणार याचा सुरुवातीलाच अंदाज येणार आहे. उद्या सकाळपासूनच आमचे संकेतस्थळ, चॅनेल आणि सर्व सोसल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पेशल कव्हरेज पाहायला मिळणार आहे. टीव्ही9 ने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नेटवर्क तयार केलं आहे. 2017 आणि 2019च्या व्होटिंग पॅटर्नच्या आधारावर तुम्हाला निकालाच्या आधीच निकालाची माहिती मिळणार आहे. पार्थप्रतिम दास हे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आहेत. पश्चिम बंगालच्या निकालावेळी त्यांनी पहिल्या तासातच पश्चिम बंगालचं अचूक राजकीय विश्लेषण केलं होतं. तेच तुम्हाला उद्याच्या निकालावर अचूक माहिती देणार आहेत.

प्रत्येक जागेची माहिती मिळणार

निकालाची आकडेवारी देतानाच तुम्हाला या निकालाच्या बातम्याही वाचता येणार आहेत. कोणत्या जागेवर कुठला उमेदवार उभा होता, त्याची लढत कुणाशी होती, किती मताने तो पुढे आहे, याची माहिती तुम्हाला बातम्यांमधून वाचता येणार आहे. निवडणुकीत कोणता फॅक्टर चालला. कुणाला कुठे गणित जमलं, तर कोणत्या पक्षाचं गणित कुठं गडबडलं याची माहितीही तुम्हाला मिळणार आहे. या शिवाय ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हााल निवडणुकीची आकडेवारी बघता येणार आहे. सर्व पाच राज्यातील प्रत्येक जागेची माहितीही तुम्हाला मिळणार आहे. तसेच प्रत्येक जागेवरील जिंकणाऱ्या उमेदवाराचे नावही तुम्हाला कळणार आहे.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान

उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी मतदान होत आहे. सात टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान पार पडलं आहे. यूपीत 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी, 3 आणि 7 मार्चला मतदान झालं. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झालं. या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. याच दिवशी गोव्यातही एका टप्प्यात 40 जागांसाठी मतदान झालं. त्याशिवाय पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी 117 जागांसाठी मतदान झालं. तर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात म्हणजे 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान झालं.

संबंधित बातम्या:

UP Election 2022 LIVE Updates : केंद्रातील सत्तेसाठी निर्णायक ठरणाऱ्या यूपीचा कौल कुणाला? भाजप की समाजवादी पार्टी सत्ता मिळवणार?

5 State Election 2022 LIVE : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे काऊण्टडाऊन सुरु, देशाचं लक्ष

Assembly Election Results 2022 Date : 10 मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल, निकाल कुठे? कसा बघाल? वाचा एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.