मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट, फक्त 48 मतांनी विजयी

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघात रविंद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांच्या विरोधात अमोल किर्तीकर मैदानात होते. दोघांमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती. आता शेवटी फेरमतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट, फक्त 48 मतांनी विजयी
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 8:09 PM

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचं आव्हान होतं. अतिशय कांटे की टक्कर सुरु असताना अखेर अमोल किर्तीकर यांचा पराभव झाला आहे. अमोल किर्तीकर हे सुरुवातीला 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी झाली. किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कांटे की टक्कर झाली. पहिल्या फेरीपासून दोघांमध्ये जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. पण त्यावर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. ईव्हीएम मतांमध्ये अमोल किर्तीकर यांना 4 लाख 995 मते, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 994 मते मिळाली होती. ईव्हीएममध्ये वायकर यांना अवघे एकच मत अधिक होते. त्यानंतर 3049 पोस्टल मतांची मोजणी झाली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना 1500 तर रविंद्र वायकर यांना 1549 मते मिळाली. त्यानंतर वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.