UP Election: युपीच्या राजकारणात बिकनीची चर्चा, करिअरचा राजकारणाशी संबंध जोडू नका
काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव असलेली बिकनी क्वीन अर्चना गौतम हिच्या काही बिकनीतले फोटो तिच्या विरुद्ध असलेल्या उमेदवाराणे वायरल करायला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेश – यूपीच्या (up) राजकारणावर (politics) अवघ्या जगाचं लक्ष लागून राहील आहे. पाच राज्यांच्या तुलनेत यूपी राजकीय समीकरण खूप जलदगतीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांनी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून प्रत्येक उमेदवार आपल्या समोरच्या उमेदवाराची वाईट बातम्या (news) विधानसभा क्षेत्रात पसरवायला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव असलेली बिकनी क्वीन अर्चना गौतम हिच्या काही बिकनीतले फोटो तिच्या विरुद्ध असलेल्या उमेदवाराणे वायरल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चिडलेल्या अर्चना गौतम हिने राजकारणाचा आणि माझ्या करिअर संबंध जोडू नका अशी विनंती यूपीच्या जनतेला केली आहे.
अर्चनाने आतापर्यंत 2018 मध्ये मी मिस बिकनिमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 2014 मध्ये मी मिस उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. तर ती 2018 मध्ये मिस कॉस्मो वर्ल्ड राहिली आहे. या तिच्या करिअरचा समोरच्या उमेदवाराने फायदा घ्यायचा ठरवला आहे.
बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अर्चनाने करिअर आणि राजकारण यामधील फरक जनतेच्या समोर विविध माध्यमातुन मांडला आहे. तसेच येत्या काळात येणा-या अपवांना तुम्ही बळी पडू नका असंही जाहीर केलं आहे. कारण अशा पध्दतीच्या अफवा तुम्हाच्या कानावर काही दिवस पडतील त्याकडे दुर्लक्ष करून मतदान करा अशी इच्छा अर्चना गौतम यांनी व्यक्त केली आहे.
403 जागांसाठी रणसंग्राम उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.