दुर्देवी… कालच मतदान, आज उमेदवाराचा मृत्यू; ‘या’ आजाराशी देत होते झुंज

सर्वेश सिंह यांनी पहिल्यांदा 1991मध्ये भाजपच्या तिकीटावर ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर सलग चारवेळा ते विजयी झाले. सर्वेश सिंह 1991 नंतर 1993, 1996 आणि 2002 मध्ये सातत्याने निवडणूक जिंकले.

दुर्देवी... कालच मतदान, आज उमेदवाराचा मृत्यू; 'या' आजाराशी देत होते झुंज
Kunwar Sarvesh KumarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 9:53 PM

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन झालं आहे. त्यांनी आज संध्याकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. कुंवर सर्वेश सिंह यांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यावेळी ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कँन्सर झाला होता. या आजाराशी झुंज देत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे काल 19 एप्रिल रोजी मुरादाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. त्यानंतर आज कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन झाल्याने मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काल पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. मुरादाबादमध्ये 60 टक्के मतदान झालं होतं. तर 2019मध्ये या मतदारसंघात 65.39 टक्के मतदान झालं होतं. कुंवर सर्वेश कुमार सिंह हे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेत्यांपैकी एक आहेत. व्यवसायाने ते उद्योजक आहेत. 2014मध्ये ते मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. 2014मध्ये कांठ विधानसभा मतदारसंघात झालेल्या लाऊडस्पीकर वादात सर्वेश यांची मोठी चर्चा झाली होती. या वादात ते असल्याने त्यांच्यावर आरोपप्रत्यारोप झाले होते.

राजकीय प्रवास

सर्वेश सिंह यांनी पहिल्यांदा 1991मध्ये भाजपच्या तिकीटावर ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर सलग चारवेळा ते विजयी झाले. सर्वेश सिंह 1991 नंतर 1993, 1996 आणि 2002 मध्ये सातत्याने निवडणूक जिंकले. मात्र, 2007मध्ये त्यांना बसपा उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. सर्वेश सिंह यांचा मुलगा सुशांत सिंह हा बिजनौरच्या बढापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे.

चौथ्यांदा निवडणूक लढले

सर्वेश सिंह यांना भाजपने चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. यापूर्वी 2009मध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014मध्ये त्यांचा सामना समाजवादी पार्टीच्या डॉ. एसटी हसन यांच्याशी झाला. या निवडणुकीत सर्वेश सिंह विजयी झाले होते. त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही त्यांनी लढत दिली होती. पण त्यावेळी त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.