सोलापुरात मोठा ट्विस्ट… थेट उमेदवार बदलण्याचीच मागणी; धुसफुस कोणत्या पक्षात?

सुशील कुमार शिंदे करमाळ्यातून लढले तेव्हा ते उपरे नव्हते का? शिंदेंचे पूर्वज धाराशीव परांडा तालुक्यातील आहेत. धाराशीवमधून ते सोलापूरात आलेत. त्यामुळे मला उपरा म्हणून हिणवण्याचा प्रणिती ताईंना अधिकार नाही. प्रणिती ताईंचा नैतिक पराभव झालेला आहे. आम्ही महायुती मिळून प्रणिती ताईंचा पराभव करणार आहोत, असं सोलापुरातील भाजपचे उमेदवार राम सातपुते म्हणाले.

सोलापुरात मोठा ट्विस्ट... थेट उमेदवार बदलण्याचीच मागणी; धुसफुस कोणत्या पक्षात?
congress bjp logoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 6:53 PM

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांचं नाव जाहीर केलं आहे. तर भाजपने राम सातपुते यांचं नाव जाहीर केलं आहे. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यासही सुरुवात केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लेटर वॉरही सुरू झालं आहे. असं असतानाच सोलापूरमधून एक मोओठी बातमी येऊन धडकली आहे. भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने थेट सोलापूरचा उमेदवारच बदलण्याची मागणी केली आहे. सोलापूरचा उमेदवार बदलून त्याऐवजी स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असा आग्रह या इच्छूक उमेदवाराने धरला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भाजप कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती सलचे माजी उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी ही मागमी केली आहे. दिलीप शिंदे हे सोलापूरमधून लोकसभेसाठी इच्छूक आहेत. सोलापुरातील उमेदवार बदला अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. माढ्यातील भाजपचा उमेदवार बदला ही मागणी जोर धरत असताना आता सोलापूरचा ही उमेदवार बदलण्याची मागणी पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या ऐवजी सोलापूरच्या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच दिलीप शिंदे यांनी थेट मागणी केल्याने या मागणीला आणखी बळ मिळालं आहे.

त्यांना का डावलण्यात आले?

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी जाणीवपूर्वक उपरा उमेदवार दिल्याचा आरोपही केला जात आहे. राम सातपुते यांना उमेदवारी देण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे स्थानिक 19 इच्छुक उमेदवार असताना त्यांना का डावलण्यात आले? असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे. भाजपने उपरा उमेदवार बदलून स्थानिक उमेदवार नाही दिला तर भाजपचा पराभव होणार असल्याचा दावा दिलीप शिंदे यांनी केला आहे.

सालगडी म्हणून काम करेल

दरम्यान, राम सातपुते यांनी प्रचार सुरू केला आहे. सोलापूरकरांना भावनिक आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरचा सालगडी म्हणून मी काम करेन. आम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. आज या जिल्ह्यात ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध श्रीमंताची कन्या असा संघर्ष आहे. ही निवडणूक सोलापूरच्या जनतेने हातात घेतली आहे. माझा बाप आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री नव्हता तर मी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, असं राम सातपुते यांनी म्हटलंय.

ते उपरे होते काय?

सोलापूरची लढाई समोरासमोर आहे. दहा वर्षापूर्वीचा हिशोब यांना द्यावा लागेल. विडी कामगारांना घरे, रस्ते देण्यासाठी मोदीजींना यावे लागले. उपरा उमेदवार म्हणून मला हिनवलं जातंय. पण मी सोलापूर जिल्ह्यातील आमदार आहे. यांच्या वडिलांनी कधी करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरमधून निवडणूक लढवलेली आहे. मग ते उपरे होते का?, असा सवाल सातपुते यांनी केलाय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.