Karnataka CM Race : ‘मुख्यमंत्रीपद हे काही…’ DK Shivakumar यांचं मोठं विधान

Karnataka CM Race : काँग्रेसला अजूनही कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवता आलेला नाहीय. त्यात शिवकुमार यांनी महत्वाच विधान केलय. "कोणी सांगितलं आकडे त्यांच्याकडे आहेत?.

Karnataka CM Race : 'मुख्यमंत्रीपद हे काही...'  DK Shivakumar यांचं मोठं विधान
dkshivkumar-siddhrammiyaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 12:38 PM

बंगळुरु : मागच्या आठवड्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कर्नाटकातील जनतेने भाजपाला सत्तेवरुन खाली खेचत काँग्रेसला कौल दिलाय. काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. पण काँग्रेसला अजून मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवता आलेला नाहीय. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. सिद्धरमय्या हे कर्नाटकातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद संभाळण्याचा अनुभव आहे.

त्याचवेळी डीके शिवकुमार यांच्याकडे संकटमोचक म्हणून पाहिलं जातं. पक्ष अडचणीत असताना नेहमीच ते संकटमोचक बनून पक्षासाठी उभे राहिले आहेत. आता ते प्रदेशाध्यक्ष असतानाच काँग्रेसने मोठं बहुमत मिळवलय.

‘फक्त एक नंबर आहे 135’

कर्नाटकात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरण्याआधी डीके शिवकुमार यांनी काही महत्वाची विधान केली आहेत. आमदाराच्या पाठिंब्याचा आकाड सिद्धरमय्या यांच्याकडे आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील? या प्रश्नावर शिवकुमार सरळ म्हणाले, “कोणी सांगितलं आकडे त्यांच्याकडे आहेत?. कुठलेही नंबर नाहीयत. फक्त एक नंबर आहे 135” ही काँग्रेस आमदारांची संख्या आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

‘त्यावेळी तिथे काय ती चर्चा’

सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? या प्रश्नावर शिवकुमार म्हणाले की, अजूनपर्यंत काही ठरलेलं नाहीय. मी मंगळवारी नवी दिल्लीला जाईन त्यावेळी तिथे काय ती चर्चा होईल.

तुम्ही पद वाटून घ्याल का?

सिद्धरमय्या यांच्यासोबत तुम्ही पद वाटून घ्याल का? या प्रश्नावर डीके शिवकुमार म्हणाले की, भावंडांमध्ये वाटतात, तशी ही काही वडिलोपार्जित संपत्ती नाही. सरकार स्थापनेचा प्रश्न आहे. यात काही वाटप होऊ शकत नाही. तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?

सिद्धरमय्या मुख्यमंत्री झाले, तर तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? या प्रश्नावर शिवकुमार सरळ म्हणाले, “अजून काही चर्चा झालेली नाही किंवा अंतिम काही ठरलेलं सुद्धा नाही. माझ्या काही मागण्या नाहीत”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.