Punjab Assembly Election 2022: जे यूक्रेनमध्ये ते पंजाबमध्ये, तिथं कॉमेडियन पंतप्रधान झाला इथं मुख्यमंत्री, कोण आहेत भगवंत मान?

Punjab Assembly Election 2022 रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारून युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्सकी अचानक चर्चेत आले आहेत. एक कॉमेडियन ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

Punjab Assembly Election 2022: जे यूक्रेनमध्ये ते पंजाबमध्ये, तिथं कॉमेडियन पंतप्रधान झाला इथं मुख्यमंत्री, कोण आहेत भगवंत मान?
जे यूक्रेनमध्ये ते पंजाबमध्ये, तिथं कॉमेडियन पंतप्रधान झाला इथं मुख्यमंत्री, कोण आहेत भगवंत मान?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:36 PM

चंदीगड:शियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारून युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्सकी (Ukrainian President Volodymyr Zelensky)अचानक चर्चेत आले आहेत. एक कॉमेडियन ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. काही अंशी तिच पुनरावृत्ती पंजाबमध्येही (Punjab Assembly Election 2022) घडताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येत असल्याचं सुरुवातीच्या कलावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आपचे नेते भगवंत मान (bhagwant mann) हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेच कल कायम राहिल्यास भगवंत मान हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील. भगवंत मानही राजकारणात येण्यापूर्वी जेलेन्स्की यांच्याप्रमाणे सिनेसृष्टीत होते. तेही फिल्मी दुनियेत कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जसा जेलेन्स्की यांचा कॉमेडियन ते पंतप्रधान असा प्रवास घडला, तसाच कॉमेडियन ते मुख्यमंत्री असा मान यांचा प्रवास होणार असल्याची शक्यता आहे.

पंजाबचं चित्रं काय?

पंजाब विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 91, काँग्रेसला 17, अकाली दलाला 6, भाजपला दोन आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे.

कॉमेडियन ते पंतप्रधान

वोलोदिमीर जेलेन्स्की यांचे वडील ऑलेक्‍जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली. परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले पदवीचं शिक्षण घेतलं.

1997 मध्ये वोलोदिमीर यांनी काही अभिनेत्यासोबत एकत्र येऊन ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. लोकांनी वोलोदिमीर यांच्या कामाला खूप पसंती दिली. ज्याचा परिणाम इतका झाला की , 2003 मध्ये त्यांनी आपले कार्यक्रम सुरू केले. स्वतः च्याच एका कार्यक्रमातून प्रेरित होऊन भविष्यात राजकारण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचे त्यांनी ठरवले. अशाप्रकारे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्‍ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे पंतप्रधानपद भूषविले.

भगवंत मान यांचा राजकीय प्रवास कसा?

पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सतोज हे भगवंत मान यांचं जन्म गाव. जुगनू हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांनी संगरुरच्या एसयूएस महाविद्यालयातील बीकॉम केलं. मात्र, त्यांना नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करायचा नव्हता. काही तरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला कॉमेडी शो सुरू केले. कॉमेडी शोमधून जोक्स ऐकवून लोकांना मनमुराद हसवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

पहिल्याच निवडणुकीत पराभव

पंजाब पिपल्स पार्टीतून त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. 2012मध्ये त्यांनी लहरा येथून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. 2014मध्ये आपने त्यांना संगरुर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. यावेळी मात्र ते 2 लाख मतांनी विजयी झाले. मधल्या काळात कुटुंबाला वेळ देता येत नसल्याने पत्नीशी वारंवार वाद व्हायचे. त्यामुळे त्यांनी पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

पुन्हा पराभव

2017मध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात निवडणूक लढवली. जलालाबादमधून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मान यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2019मध्ये त्यांनी संगरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

पदाचा राजीनामा

2017मध्ये त्यांना आपने पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 2018मध्ये ड्रग्सचे आरोप आणि मानहानीच्या प्रकरणात आपच्या नेत्यांनी बिक्रम सिंग मजिठीया यांची माफी मागितली. त्यानंतर मान यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण केजरीवाल यांनी समजावल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.

संबंधित बातम्या:

Election Result 2022 Live: शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा आठवले भारी, मणिपूरमध्ये रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशात भाजपाची मुसंडी, महाराष्ट्रातलं ठाकरे सरकारवर संकट? बीएमसीचेही गणित बदलणार?

Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.