Goa Assembly Election 2022 : गोव्यासाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी, शरद पवारांसह कोणते नेते प्रचारासाठी रिंगणात उतरणार?

| Updated on: Feb 02, 2022 | 4:56 PM

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे आदींचा समावेश आहे.

Goa Assembly Election 2022 : गोव्यासाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी, शरद पवारांसह कोणते नेते प्रचारासाठी रिंगणात उतरणार?
शरद पवार पवारांनी सांगतला कोरोना काळातील ट्रेनचा किस्सा
Follow us on

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) रणधुमाळी जोरदार सुरु आहे. अशावेळी भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं युती करुन गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी आता गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे आदींचा समावेश आहे. या स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांनी प्रसिद्धीला दिली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

  • शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
  • प्रफुल पटेल, माजी खासदार
  • सुनिल तटकरे, खासदार
  • सुप्रिया सुळे, खासदार
  • अजित पवार, उपमुख्यमंत्री
  • दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
  • जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री
  • जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
  • नवाब मलिक, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
  • धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
  • हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
  • ए. के. ससिनद्रन, केरळचे वनमंत्री
  • नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय प्रवक्ते
  • फौजिया खान, खासदार
  • धीरज शर्मा, युवक राष्ट्रीय अध्यक्ष
  • सोनिया दुहन, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा
  • शब्बीर विद्रोही, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष
  • जोसे फिलीप डिसोजा, गोवा अध्यक्ष
  • डॉ. प्रफुल हेडे
  • अविनाश भोसले
  • सतिश नारायणी (गोवा),
  • पी. सी. चोको, केरळचे अध्यक्ष
  • थॉमस के. थॉमस, केरळचे आमदार
  • क्लाईड क्रास्टो, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते

गोव्यात “महाविकास आघाडी’बाबत पी. चिदंबरम यांचं सूचक वक्तव्य

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्यात युती होऊ शकली नाही, परंतु आमची मैत्री कायम राहील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी व्यक्त केला. तसेच निवडणुकीनंतर राष्ट्रवादी, शिवसेनेसोबत एकत्र काम करण्याची संधी काँग्रेस शोधत राहील, असेही चिदंबरम म्हणाले आहेत.

इतर बातम्या :

ओबीसीच्या निर्णयाचं स्वागत, 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास राज्यपालांचा नागरी सत्कार करु : संजय राऊत

Assembly Elections 2022: निवडणूक आयोगाने जाहीर सभांवरील बंदी उठवली, पाच राज्यात निवडणुकीचा जोर वाढणार