Goa Election Exit Poll Result 2022: स्पष्ट बहुमत कुणालाच नाही! मग सत्ता कुणाची? छोटे पक्ष ठरवणार

Goa Election Exit Poll Result 2022:

Goa Election Exit Poll Result 2022: स्पष्ट बहुमत कुणालाच नाही! मग सत्ता कुणाची? छोटे पक्ष ठरवणार
Goa Assembly Election 2022 एक्झिट पोलचा अंदाज समोर!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 7:39 PM

मुंबई : देशाच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल (5 State Assembly EXIT Poll) समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह अनेकांची नजर छोट्याशा गोव्यावर लागली होती. उत्पल पर्रीकराना तिकीट न देण्यापासून ते अनेक बंडखोरांची आव्हानं थोपवण्याचा प्रश्न भाजपला गोव्यात सोडवावा लागला होता. अखेर आता मतदान पूर्ण झाल्यानं गोव्याचे (Goa Assembly Election) एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचं समोर आलं आहे. मात्र सर्वाधिक जागा या सत्ताधारी भाजपलाच (Bharatiya Janata Party) मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल, तर आपनंही गोव्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आपचा किमान चार जागी विजय होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार, गोवा विधानसभेतील एकूण 40 जागांपैकी भाजपला 17 ते 19 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 11 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आप गोवा विधानसभेत आपलं खातं उघडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आपचे 1 ते 4 उमेदवार निवडून येऊ शकतात, अशी शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

दुसरीकडे गोव्यात अपक्षांसह इतर छोटे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावण्यासोबतच किंगमेकर ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. टीएमसी आणि मगोनं गोव्यात युती केली आहे. तर दुसरकडे आता गोवा फॉरवर्डच्या किती जागा निवडून येतात हेही पाहणं महत्त्वाचंय. गोव्यात आप, काँग्रेस आघाडी आणि भाजप वगळता इतरांना दोन ते सात जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे.

सध्याचं गोव्याचं बलाबल काय आहे?

गोवा विधानसभेच्या एकूण जागा 40 जागा आहेत. सध्या गोव्यात भाजपचे 17 आमदार असून काँग्रेसचे 13 आमदार आहेत. तर मगोपचे 3 आणि गोवा फॉरवर्डचे 3 आमदार होते. मात्र अनेक आमदारांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राजीनामे देत उमेदवारीसाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षांतर केलं होतं. तर अनेक उमेदवार ही अपक्षही निवडणुकीला सामोरे गेले आहेत.

भाजपचं 2022मध्ये 22 जागांचं ध्येय!

2022च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 22 जागा जिंकण्याचे ध्येय भाजपनं ठेवलं होतं. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं 2022ची निवडणूक लढवली आहे. गोवा विधानसभेची निवडणूक ही संपूर्ण देशात उत्पल पर्रीकर यांना भाजपनं उमेदवारी न दिल्यामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, भाजपसमोर बंडखोर उमेदवारांचंही आव्हान होतं. या सगळ्या परिस्थितीही गोव्यात भाजपच मोठा पक्ष असेल, असा अंदाज एक्झिट पोलवरुन समोर आला आहे.

मात्र बहुमतापेक्षा कमी जागा असल्यानं आता गोव्यातील राजकीय समीकरणं नेमकी काय तयार होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 10 मार्चला गोवा विधानसभा निवडणूक निकालासह इतर पाच राज्यांचाही निकाल जाहीर होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेच्या सर्व चाळीसही जागांचं एकाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं.

संबंधित बातम्या :

Goa Election Exit Poll Result 2022 : गोव्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघात कोण बाजी मारणार? जाणून …

Exit Poll Results 2022 LIVE : उत्तर प्रदेश गोव्यात भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता

Exit Poll Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये सातव्या टप्प्यातील जागांसाठी मतदान, 5 राज्यांच्या एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.