Goa : विश्वजीत राणेंच्या राज्यपाल श्रीधरन पिल्लईंच्या भेटीनं खळबळ, गोव्यात तर्क वितर्क सुरु

गोव्यातून मोठी बातमी समोर येत असून विश्वजीत राणे यांनी राजभवनात राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आहे. विश्वजित राणे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात असल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

Goa : विश्वजीत राणेंच्या राज्यपाल श्रीधरन पिल्लईंच्या भेटीनं खळबळ, गोव्यात तर्क वितर्क सुरु
विश्वजीत राणेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:53 PM

पणजी : गोव्याच्या (Goa) राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. गोव्यातून मोठी बातमी समोर येत असून विश्वजीत राणे यांनी राजभवनात राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आहे. विश्वजित राणे यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात असल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा हे देखील एक कारण असू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  विश्वजीत राणे यांच्या पत्नी देखील आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठींब्यावरून भाजपातील (BJP) मतभेद आधीच चव्हाट्यावर आले असताना, विश्वजीत राणे यांनी आज अचानक स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेतल्याने भाजप अंतर्गत मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच उघड झालीय

गोव्याचं राजकारण पुन्हा अस्थिरतेच्या वाटेवर?

विश्वजीत राणे यांनी राजभवनात घेतली राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आहे. राणे आणि राज्यपाल भेटीचे कारण गुलदस्त्यात असल्यानं गोव्याच्या राजकारणात पुन्हा अस्थिरता येणार का असा प्रश्न निर्माण झालाय. विश्वजीत राणे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. निवडणूक निकालादिवशी राणे यांनी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांचा फोटो व्हाटसअप स्टेटसला ठेवल्यानं देखील चर्चा रंगल्या होत्या. विश्वजीत राणे राज्यपालांना भेटल्यानंतर, त्यांनी बाबुश मोंसेरात आणि भाजपतील अन्य काही आमदारांसोबत एका ठिकाणी बैठक केली. या बैठकीतून बाहेर पडताना बाबुश मोंसेरात यांनी चहापनासाठी आम्ही एकत्र भेटलो असे कारण देत वेळ मारून नेली.

मगोपच्या पाठिंब्यावरुन मतभेद उघडकीस

भाजपनं सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच गोवा भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही, अशी भूमिका भाजप आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी घेतली होती. रवी नाईक यांच्यासह गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, बाबुश मोंसेरात यांचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेण्यास स्पष्ट विरोध केला आहे.महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर हे दोन आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तृणमूल पक्षाशी युतीत निवडणूक लढवली. निकालानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्र दिले आहे.भाजपचे 20 आमदार निवडून आले असून, 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांचा सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा आहे.

प्रमोद सावंत काळजीवाहू मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. डॉ. प्रमोद सावंत हे आता काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

इतर बातम्या:

रामदास आठवले लोकसभा लढवणार? राधाकृष्ण विखे पाटलांना दिलं भन्नाट उत्तर

Ramdas Aathwale | गांधी कुटुंबिय व्यतिरिक्त इतर नेत्यांना काँग्रस पक्षाची धुरा देण्याची गरज

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.