Goa Elections 2022 : ज्येष्ठांना दरमहा 3 हजाराची पेन्शन, तरुणांना रोजगार भत्ता नव्हे रोजगार, गोंयकारांसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता भाजपने गोंयकारांसाठी लोकप्रिय जाहीरनामा जाहीर केला आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यात गोयंकरांसाठी एकूण 22 संकल्प करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्यापासून ते तरुणांना बेरोजार भत्त्याऐवजी रोजगार देण्यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Elections ) रणधुमाळी सुरू असतानाच आता भाजपने (bjp) गोयंकरांसाठी लोकप्रिय जाहीरनामा (Manifesto) जाहीर केला आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यात गोंयकारांसाठी एकूण 22 संकल्प करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्यापासून ते तरुणांना बेरोजार भत्त्याऐवजी रोजगार देण्यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये पाच हजार रुपये टाकणार असल्याचं या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्रातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यातील लोकप्रिय घोषणांची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. महिलांना घर खरेदीसाठी दोन टक्के व्याजाचं कर्ज देण्यता येणार आहे. तरुणांना रोजगार भत्ता दिला जाणार नाही. त्याऐवजी रोजगार देऊन त्यांच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये पाच हजार रुपये टाकले जाणार आहेत. गोव्यात पायाभूत सुविधांसाठी चांगली गुंतवणूक झाली आहे. या पुढेही होणार आहे. त्यामुळे आम्ही गोव्याला टुरिझम हब करणार आहोत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. क्लिन ट्रान्स्पोर्टेशनचाही संकल्प करण्यात येणार आहे. तसेच या जाहीरनाम्यातून 22 संकल्प करण्यात आले असून गोयंकर भाजपला पुन्हा एकदा आशीर्वाद देतील याचा आम्हाला विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भविष्यात कुणी पेट्रोलच विकत घेणार नाही
गोव्यात लक्झरी बसेस येणार असून या सर्व बसेस इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असतील. चार्जिंग स्टेशनही येतील. ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी दिल्लीत आली आहे. पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करून हायड्रोजनवर चालणारी ही गाडी आहे. फरिदाबादच्या इंडियन ऑईलमध्ये त्याचं ग्रीन हायड्रोजन तयार होणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसात दिल्लीच्या रस्त्यावर पायलट प्रोजेक्ट म्हणून ही गाडी धावणार आहे. ग्रीन हायड्रोजन हेच आता भविष्य आहे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले. येणाऱ्या काळात पेट्रोल कुणी विकतच घेणार नाही. 80 रुपयांचा भाव सांगणं ही निव्वळ धुळफेक आहे, असंही ते म्हणाले.
पर्रिकरांनी गोव्याला व्हिजन दिलं
मनोहर पर्रिकर यांनी गोव्याला व्हिजन दिलं. आयटी इंडस्ट्री आणि पर्यटनाला चालना दिली. तेच धोरण प्रमोद सावंत यांनी पुढे नेलं. मनोहर पर्रिकर आणि सावंतांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या अमंलात आणल्या आहेत, असंही गडकरी यांनी सांगितलं.
गोव्याला मोहल्ला क्लिनिकची गरजच नाही
अज्ञानी असं सांगतात आम्ही मोहल्ला क्लिनिक करू. भारतात सर्वात चांगले हेल्थ सर्व्हिसेस ही फक्त गोव्यात आहे. कोणताही आजार झाला तर गोव्यात मोफत उपचार होतो. गोव्यात फाईव्ह स्टार मेडिकल सर्व्हिस दिली जात आहे. त्यामुळे गोव्याला मोहल्ला क्लिनिकची गरजच नाही, असं गडकरी म्हणाले.
BJP Manifesto Release by Shri Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways, Govt of India https://t.co/fX6p7CpyEh
— BJP Goa (@BJP4Goa) February 8, 2022
संबंधित बातम्या:
Goa Elections 2022 : गोव्यात प्रचाराची झिंग, महिलेने राहुल गांधींना मारली चक्क मिठी