Election Result 2022 Live: भाजपच्या विश्वजीत राणेंच्या WhatsApp Statusने गदारोळ! काँग्रेस नेत्याचा फोटो ठेवल्यानं चर्चेत
Goa Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi : अखेर गदारोळ वाढल्यानंतर विश्वजीत राणे यांनी व्हॉट्सऍप स्टेटवरुन काँग्रेस नेत्यांचा (Photo of Congress Leader) फोटो हटवला आहे.
पणजी : गोवा सरकारमधील आरोग्यमंत्री असलेल्या भाजपच्या विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेस नेत्याचा फोटो विश्वजीत राणेंच्या व्हॉट्सऍप स्टेटवर झळकल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत विचारणा केली असता भाजप नेत्यांनाही स्पष्टीकरण देताना नाकी नऊ आले होते. दरम्यान, याबाबत विश्वजीत राणे यांनी मात्र मौन धारण केलं होतं. विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असल्याचं बोललं जातंय. प्रतापसिंह राणे यांचे सुपुत्र असलेले विश्वजीत राणे आणि गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अनेकदा चढाओढ असल्याचं गोव्याच्या राजकारणानं अनुभवलं आहे. दरम्यान, अखेर गदारोळ वाढल्यानंतर विश्वजीत राणे यांनी व्हॉट्सऍप स्टेटवरुन काँग्रेस नेत्यांचा (Photo of Congress Leader) फोटो हटवला आहे. उत्तर गोव्याच्या वाळपई (Valpoi) मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या विश्वजीत राणे यांच्याविरोधात पणजीचे आमदार बाबुश मॉन्सेरात यांनीही सनसनाटी आरोप करत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा विश्वजीत राणे ऐन निवडणुकीच्या काळात चर्चेत आले आहेत.
काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांचा फोटो भाजपच्या विश्वजीत राणे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर झळकला होता. त्यानंतर विश्वजीत राणे यांचे नेमके राजकीय इरादे काय आहेत, यावरुन चर्चांना उधाणा आलं होतं. गोवा विधानसभेच्या निवडणुकांच्या अवघे काही दिवस आङी हा फोटो समोर आल्यानं गोव्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. भाजप हायकमांडनं या फोटोवरुन समज दिल्यानंतर अखेर विश्वजीत राणे यांनी हा वादग्रस्त फोटो हटवला आहे. मात्र या सगळ्याप्रकरणावरुन गोव्याच राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
कोण आहेत विश्वजीत राणे?
उत्तर गोव्यात मोडणाऱ्या सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदार संघाचं विश्वजीत राणे प्रतिनिधीत्व करतात. उत्तर गोव्यातील वाळपई विधानसभा मतदार संघावर काँग्रेसची सत्ता होती. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसनं वाळपईत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. 2017 मध्ये वाळपई विधानसभा मतदारसंघात एकूण 28835 इतके मतदार होते, त्यापैकू 25326 जणांनी मतदान केलं होतं. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विश्वजीत राणेंनी विजय मिळवला होता. 2007 मध्ये वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणेंचा बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले होते.
Attended the cultural program on the occasion of 75 years of Azaadi ka Amrit Mahotsav hosted.
I highly appreciate this initiative by our government. Such functions need to take place throughout our nation in order to enlighten the youth of our country about the freedom struggle. pic.twitter.com/rEHzsCN6he
— VishwajitRane (@visrane) February 27, 2022
दरम्यान, 2012 साली वाळपई विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आणि विश्वजीत राणे यांचे वडील प्रतापसिंह राणेंनी निवडणूक लढवली आणि ते विजयीदेखील झाले आहे. दरम्यान, नंतरच्या काळात विश्वजीत राणे हे भाजपात गेले. तर प्रतापसिंह राणेंनी पर्येतून निवडणूक लढवली. राणे पितापुत्रांनी उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात मोडणाऱ्या या दोन्ही मतदारसंघावर आपला दबदबा कायम ठेवलाय.
निकालाची उत्सुकता!
गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठीची मतमोजणी आज पार पडते आहे. एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजानुसार गोव्यात कुणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, भाजपला गोव्यात सत्ता राखण्यात यश मिळतं की अपयश येतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मनोहर पर्रीकरांशिवाय भाजप गोवा विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी करुन दाखते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
वाचा LIVE अपडेट्स गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!
EXIT Poll नुसार स्पष्ट बहुमत कुणालाच नाही! मग सत्ता कुणाची? छोटे पक्ष ठरवणार