Goa Assembly Election: बेरोजगारांना 3000/-, 18 वर्षावरील महिलांना 1000/-, केजरीवालांची घोषणा

Arvind Kejriwal : गेल्या वर्षभरापासून आम आदमी पार्टी गोव्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात आपकडून घोषणांचा पाऊस पाडला जातो आहेत. तेरा महत्त्वाच्या घोषणा करत आपनं गोव्यासाठीचा मेगा प्लान घोषित केला आहे.

Goa Assembly Election: बेरोजगारांना 3000/-, 18 वर्षावरील महिलांना 1000/-, केजरीवालांची घोषणा
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 2:38 PM

पणजी : गोव्यासाठी अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejariwal) अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला आहे. आधी मोफत वीज, त्यानंतर पाणी यासोबत आता बेरोजगार आणि महिलांसाठीही दिल्लीचे मुख्मयंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा गोव्यात केली आहे. गोव्यात जर आपचं सरकार आलं, तर प्रत्येकाला रोजगार दिला जाईल, असंही त्यांनी आश्वस्त केलं आहे. पण जर प्रत्येकाला रोजगार देणं शक्य झालं नाही, तर बेरोजगारांना तीन हजार रुपये भत्ता देण्यात येईल, असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. दरम्यान, 18 वर्षांवरील सर्व महिलांना एक रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या मोठ्या घोषणेला मतदार आकर्षित होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आपच्या तेरा घोषणा

गेल्या वर्षभरापासून आम आदमी पार्टी गोव्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात आपकडून घोषणांचा पाऊस पाडला जातो आहेत. तेरा महत्त्वाच्या घोषणा करत आपनं गोव्यासाठीचा मेगा प्लान घोषित केला आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. एकाच टप्प्यात गोवा विधानसभा निवडणूक होणार असून 10 मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

आपनं केलेल्या 25 घोषणा कोणत्या?

  1. सर्वांना रोजगार
  2. खाणी सुरु करणं
  3. जमीन मालकीचा प्रश्न सोडवणं
  4. शिक्षणात क्रांती करणं
  5. आरोग्य क्षेत्र सुधारणं
  6. भ्रष्टाचारमुक्त सरकारन देणार
  7. महिलांसाठी दरमहा एक रुपये भत्त
  8. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं
  9. व्यवसाय वाढवणं
  10. पर्यटनाला अधिक चालना देणं
  11. मोफत वीज देणं
  12. मोफत पाणी देणं
  13. रस्त्यांचा प्रश्न निकाली काढणं

25 उमेदवार घोषित

आपनं आतापर्यंत गोव्याच्या 40 पैकी 25 मतदारसंघात कोण निवडणूक लढणार आहे, याचीही यादी घोषित केली आहे. पहिल्या दोन यादीत आपनं प्रत्येकी दहा उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर तिसऱ्या यादीत आणखी पाच उमेदवारांची घोषणा आपनं केली होती.

संबंधित बातम्या :

गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं, आम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी देणार: संजय राऊत

VIDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर भाजप सोडणार? पणजीतून बाबूश मोंसेरात यांचं नाव निश्चित : सूत्र

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.