Goa Elections Result 2022 | गोव्याचे मुख्यमंत्री हरता-हरता जिंकले, दोन्ही ‘आयाराम’ उपमुख्यमंत्री पडले

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखेर दिलासा मिळाला. कारण कधी सावंत पिछाडीवर जात होते, तर कधी त्यांना अल्पशा मतांनी आघाडी मिळत होती. प्रमोद सावंत यांचा साखळी मतदारसंघातून हरता-हरता जिंकले.

Goa Elections Result 2022 | गोव्याचे मुख्यमंत्री हरता-हरता जिंकले, दोन्ही 'आयाराम' उपमुख्यमंत्री पडले
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:30 PM

गोवा : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Elections Result 2022) अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप उत्सुक आहे, मात्र काँग्रेसही कडवी झुंज देताना दिसत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाले आहेत. साखळी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना सावंतांनी पराभवाची धूळ चारली. मात्र विजय मिळवताना त्यांची पुरती दमछाक झाली. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. केपेमध्ये बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर पराभूत झाले आहेत. तर मडगाव मतदारसंघातून बाबू उर्फ मनोहर आजगावकरही चारी मुंड्या चित झाले आहेत. विशेष म्हणजे दोघंही उपमुख्यमंत्री पक्षांतर करुन भाजपात आले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखेर दिलासा मिळाला. कारण कधी सावंत पिछाडीवर जात होते, तर कधी त्यांना अल्पशा मतांनी आघाडी मिळत होती. प्रमोद सावंत यांचा साखळी मतदारसंघातून हरता-हरता जिंकले. त्यामुळे भाजप सरकारची थोडीशी लाज राहिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया :

बाबू आजगावकर

2017 मध्ये महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव करत पेडणे मतदारसंघावर पुन्हा एमजीपीच्या सिंहाची डरकाळी फोडली होती. यावेळी मात्र त्यांना पेडण्यातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. पेडण्याऐवजी त्यांना मडगावमधून तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी एमजीपीतून त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मडगावमधूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव केला काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांनी.

बाबू कवळेकर

बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यांना प्रमोद सावंत सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यांच्या पराभवानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 साली मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. तेव्हा भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसमधील काही आमदार रातोरात भाजपात गेले होते. या सगळ्यात राजकीय हालचालींमध्ये कवळेकर यांची भूमिकाही महत्त्वाची होती.

मतांमध्ये पिछेहाट होत असल्याचे दिसताच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मतमोजणी केंद्रावरुन निघून गेले होते. केपे मतदारसंघात काँग्रेसचे  उमेदवार एल्टॉन डिकॉस्ता यांनी जागा जिंकली आहे.

संबंधित बातम्या :

 गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?

शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा आठवले भारी, मणिपूरमध्ये रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार? प्रमोद सावंत पुन्हा? विश्वजीत राणेंनी सस्पेन्स निर्माण केला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.