Goa Elections 2022 | गोवा विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीचा प्रयत्न फसणार ?

गोव्यात काँग्रेस स्वबळावर लाढणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता येथे महाविकास आघाडीचा प्रयत्न फसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना काय भूमिका घेणार यालादेखील महत्त्व आलं आहे.

Goa Elections 2022  | गोवा विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीचा प्रयत्न फसणार ?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 9:04 AM

मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Elections) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. येथे तृणमूल, शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस (Congress), आप असे पक्ष निवडणूक लढवणार असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातदेखील महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडून केला जातोय. मात्र हा प्रयोग सत्त्यात उतरणार नसल्याचं दिसतंय. गोव्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता येथे महाविकास आघाडीचा प्रयत्न फसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना काय भूमिका घेणार यालादेखील महत्त्व आलं आहे.

काँग्रेस निवडणूक स्वबळावर लढवणार ?

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना तसेच राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. हे दोन्ही पक्ष येथे मोजक्या जागा लढवणार आहेत. तर निवडून येण्याची शक्यता वाढावी तसेच भाजपला शक्तीशाली पर्याय उभा राहावा म्हणून या दोन्ही पक्षांकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र गोव्यात काँग्रेस कोणाशीही आघाडी करणार नसून काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तशी प्राथमिक माहिती टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिली आहे.

शिवेसना, राष्ट्रवादी काय भूमिका घेणार ?

मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादी गोव्यात निवडणूक लढवणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली होती. यावेळी बोलताना गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. भाजपला पर्याय देण्याचा आमचा विचार आहे. गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व तेथील कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली होती. तर दुसरीकडे संजय राऊत यांनीदेखील याला दुजोरा दिला होता. “निदान गोव्यात तरी महाविकास आघाडीसारखा एखादा प्रयोग व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नक्कीच एकत्र लढण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसनं आमच्यासोबत राहावं यासाठी मी स्वत: गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. पण जागा वाटपाबाबत काही अडचणी आहेत. काँग्रेसला अजूनही वाटतं की ते स्वबळावर सत्तेत येतील,” असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र आता काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे हे दोन्ही पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या या दोन्ही पक्षांसाठी तृणमूल काँग्रेस हादेखील एक चांगला पर्याय आहे.

गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान 

दरम्यान, गोव्यात येत्या 14 फेब्रुवारी रोजी 40 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. सध्या येथे भाजपची सत्ता आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

उत्तर प्रदेशात भाजपाला गळती सुरूच; आणखी तीन आमदारांचे राजीनामे, सपाकडून भाजपाला कुलूपाची भेट

UP Assembly Election 2022 | एक मौर्य रुसले राजीनामा देऊन बसले! अमित शहांनी समजूत घालायला दुसरे मौर्य धाडले!

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.