भाजपनं उत्पल पर्रीकरांना ऑफर केलेल्या 2 जागा कोणत्या? ऑफर नाकारण्यामागची आतली बातमी

Goa Assembly Election 2022 : पणजी ही गोव्याची राजधानी. राजधानी पणजी हा गोव्याच्या राजकारणा अतिशय महत्त्वाचा असा उत्तर गोव्यातील मतदारसंघ. या मतदार संघावर भाजपचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं आहे. सातवेळा इथं भाजपनं आपली सत्ता राखली आहे.

भाजपनं उत्पल पर्रीकरांना ऑफर केलेल्या 2 जागा कोणत्या? ऑफर नाकारण्यामागची आतली बातमी
देवेंद्र फडणवीस, गोवा भाजप निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 5:44 PM

गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये (Goa Assembly Elections 2022) उत्पल पर्रिकर भाजपकडून लढणार की अपक्ष लढणार हा आता राष्ट्रीय चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे. अशातच पणजीतून लढण्यावर ठाम असलेल्या उत्पल (Utpal Parrikar) यांनी भाजपच्या दोन जागांच्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत. पण तरिही त्यांच्याशी पक्ष अजूनही चर्चा करत असल्याचं सांगितलं जातंय. अद्याप फायनल निर्णय झालेला नाही. मात्र सुरुवातीला ज्या दोन जागांची ऑफर भाजपं दिली होती, ती तर उत्पल यांनी नाकारली असल्याचं स्पष्ट झालं आहे. पणजीतून निवडणूक लढण्यावर उत्पल पर्रिकर का ठाम आहेत? भाजपनं उत्पल यांना दिलेल्या त्या दोन जागा नेमक्या कोणत्या होत्या? याबाबतही चर्चांना उधाण आलंय. नेमकी ऑफर न स्वीकारण्यामागची कारणं काय आहे, याबाबतही तर्कवितर्कांना उधाण आलंय.

कोणत्या आहेत त्या दोन जागा?

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आलेला आहे. अशातच गोव्यातील भाजपची पहिली यादीदेखील गुरुवारी जारी करण्यात आली आहे. भाजप उमेदवारांच्या यादीपेक्षा सध्या सगळ्यांचं लक्ष हे दिवंगत मनोहर पर्रिकरांच्या मुलांच्या राजकीय हालचालकींकंडे लागलेलं आहे. भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही देणार, यावरुन चर्चा जोरात रंगल्या आहेत. अशातच भाजपच्या दोन जागांचा पर्याय उत्पल पर्रिकर यांच्यासमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली होती. या दोन जागा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या असल्याचंही खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय.

गोव्यातील स्थानिक खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पल पर्रिकर यांना उत्तर गोव्यातील एक आणि दक्षिण गोव्यातील एक अशा दोन जागांची ऑफर देण्यात आली होती. उत्तर गोव्यातील सांताक्रूझ आणि दक्षिण गोव्यातील मडगाव या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं त्यांच्यासमोर ठेवला होता. पण उत्पल पर्रिकर यांनी या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला. दरम्यान, आता त्यांना उत्तर गोव्यातील डिचोलीची ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता येऊ शकलेली नाही.

ऑफर केलेल्या दोन मतदारसंघाचा इतिहास

सांताक्रूझ हा गोव्याच्या उत्तर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. या मतदार संघामध्ये सहावेळा काँग्रेसची सत्ता होती. 2017 मध्ये काँग्रेसच्या अँटोनियो फर्नांडिस यांनी विजय मिळवला होता. 1994 साली या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार व्हिक्टोरीया फर्नांडिस रोमियो यांनी निवडणूक जिंकली होती. 1999मध्ये गोमंतक लोक पार्टीतून काँग्रेसमध्ये आलेल्या व्हिक्टोरीया यांनी सांताक्रूझमधूनच निवडणूक जिंकली होती. 2002मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर दुसऱ्यांना आमदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला होता. तर 2007 सालीही त्यांनी पुन्हा ही किमया करुन दाखवली होती. सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघात 2017 साली 27711 इतके मतदार होते, ज्यापैकी 22215 जणांनी मतदान केलं होतं.

दक्षिण गोव्यातील मडगाव मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहे. अर्थात त्याआधी सलग तीन वेळा इथं भाजपची सत्ता होती. मडगावमध्ये 2017 साली 28457 इतके मतदार होते. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांनी विजय मिळवला होता. 1994 मध्ये मडगाव विधानसभा मतदारसंघातून दिगंबर कामत हे आमदार म्हणून निवडून आले होते. 1999मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. 2002 सालीही भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. तर 2007 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ही निवडणूक जिंकली देखील. 2012 साली काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत पुन्हा एकदा जिंकून आले. भाजप उमेदवार रुपेश महात्मे यांचा त्यांनी 4452 मतांनी पराभव केला होता.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात स्पर्धेचं भय?

भाजपनं ऑफर केलेले दोन्ही मतदारसंघ हे खरंतर काँग्रेसचे गड मानले जातात. या मतदारसंघातून उत्पल यांना निवडून येण्याची शक्यता फारशी नाही. जरी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं, तरिदेखील फारसं सोप्प निश्चितच नसणार. या दोन्हीच्या तुलनेत पणजी हा भाजपसाठी सेफ मतदारसंघ आहे. तसंच पणजी मतदारसंघात उत्पल यांनी आपल्या कामाला खूप आधीपासून सुरुवातही केली होती. अशावेळी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणं हे त्यांच्यासाठी तितकं सोप्प नसणार आहे.

पणजी मतदारसंघाचं महत्त्व –

पणजी ही गोव्याची राजधानी. राजधानी पणजी हा गोव्याच्या राजकारणा अतिशय महत्त्वाचा असा उत्तर गोव्यातील मतदारसंघ. या मतदार संघावर भाजपचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं आहे. सातवेळा इथं भाजपनं आपली सत्ता राखली आहे. 2017 मध्ये भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळईकर हे या मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. 1994 साली पणजी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनोहर पर्रीकरांनी निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होतीत. 1999मध्ये सलग दुसऱ्यांदा मनोहर पर्रीकरांनी पणजीत विजय मिळवला. 2022 साली मनोहर पर्रीकरांनी पणजीत हॅट्रिक मारली होती. तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी पणजीत भाजपचं वर्चस्व निर्माण केलं होतं. 2007 साली चौथ्यांदाही त्यांनी पणजीतून निवडणूक लढवून जिंकून दाखवली. 2012 सालीही भाजपच्या उमेदवारीवर मनोहर पर्रीकरांनी निवडणूक जिंकली. पाच वेळा त्यांनी पणजीतून निवडणूक लढली आणि जिंकली.

दरम्यान, 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीनं सिद्धार्थ कुंकळईकरांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनीही पक्षानं सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडली होती. 2017 साली पणजी विधानसभा मतदारसंघात एकूण 22203 इतके मतदार होते, त्यापैकी 17339 जणांनी मतदान केलं होतं. सध्या पणजीत बाबुश मॉन्सेरात हे आमदार असून सध्या ते भाजपात आहे. पणजी महानगरपालिकेतही बाबुश मॉन्सेरात यांचा मुलगा महापौर असून बाबुश यांची पत्नी 2017 च्या प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री आहेत. अशात बाबुश यांना डावलून उत्पल यांना उमेदवारी देण्याइतकी भाजपचं इमोशनल नक्कीच नाही. त्यामुळे नेमकं आता उत्पल यांच्याबाबतीत काय निर्णय भाजप घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Goa Election: भाजपने उत्पल पर्रिकरांचा पत्ता कापला, उत्पल यांनी तीन वाक्यात भाजपला फटकारलं; नेमकं काय म्हणाले?

गोवा विधानसभा निवडणुकीची प्रत्येक बित्तंबातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.