Goa Assembly Elections 2022 : मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, गोव्यातल्या शिवसेनेच्या पराभवावर फडणवीसांनी मीठ चोळलं

भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या इराद्यानं गोव्याच्या मैदानात उतरलेल्या शिवसेना आणि भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील शिवसेनेच्या पराभवावर मीठ चोळलंय.

Goa Assembly Elections 2022 : मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, गोव्यातल्या शिवसेनेच्या पराभवावर फडणवीसांनी मीठ चोळलं
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:51 PM

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप गोव्यात 20 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन अपक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट आहे.  महत्वाची बाब म्हणजे भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या इराद्यानं गोव्याच्या मैदानात उतरलेल्या शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला (NCP) भोपळाही फोडता आलेला नाही. इतकंच नाही या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही वाचू शकलेली नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्यातील शिवसेनेच्या पराभवावर मीठ चोळलंय.

‘राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं नोटापेक्षाही कमी’

शिवसेना-राष्ट्रवादीच्या पराभवाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलायय. ‘मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं पाहिली तरी ती नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली. तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं मिळाली आहेत’, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय. त्याचबरोबर काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज आहे. विशेषत: परिवारवादी पार्ट्यांना हा मोठा संदेश असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.

‘उत्पल पर्रिकर आमच्याच परिवारातील’

उत्पल पर्रिकर यांच्या पराभवाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, बाबूश विजय होणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट होतं. त्याचा मला आनंद आहे. पण उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा आनंद मी व्यक्त करत नाही. ते आमच्याच परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार असते.

महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांचा इशारा

चार राज्यात भाजपनं घवघवीत यश मिळवल्यानंतर महाराष्ट्रात भाजप कुरघोडी करणार का? असा सवाल विचारला जातोय. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘उत्तर प्रदेश तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असा इशाराच दिलाय. याबाबत बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात आम्ही 2024 ची तयारी केलीय. तेव्हा आम्ही बहुमतानं निवडून येऊ. पण तोवर सरकार पडलं तर आम्ही सरकार देऊ, असं मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे चार राज्यातील भाजपच्या मोठ्या विजयानंतर फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला हा इशारा असल्याचं बोललं जातंय.

इतर बातम्या :

गोव्यात जे पर्रिकर, गडकरींना नाही जमलं ते फडणवीसांनी करुन दाखवलं! महाराष्ट्रात जोर वाढणार?

महाराष्ट्र अभी बाकी है म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र तैयार है, शरद पवारांचं प्रतिआव्हान

Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.