Gujarat Himachal एक्झिट पोल Results LIVE: गुजरात, हिमाचलमध्ये फुलणार कमळ, दोन्ही राज्यात केजरीवालांच्या ‘आप’चा फ्लॉप शो
Gujarat Himachal Pradesh Election Exit Poll Results 2022 Live Updates in Marathi: देशातील जनतेला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुक्ता आहे. एक्झिट पोलमधून जनतेचा कौल लक्षात येईल.
अहमदाबाद: गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्याच मतदान संपलं. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. आज Exit Poll चे आकडे जाहीर होणार आहे. या दोन राज्यातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूला आहे? ते एक्झिट पोलमधून स्पष्ट होईल. सर्वाधिक लक्ष गुजरातच्या एक्झिट पोलकडे आहे. मागच्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. या राज्यात सत्ता राखण्यात भाजपा यशस्वी ठरणार की, जनता आपला कौल कुठल्या नवा पक्षाला देणार ते आज कळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
अखेर एबीपी सी-वोटरचा एक्झिट पोल जाहीर
एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपाला 128 ते 140, काँग्रेसला 31 ते 43 आणि आम आदमी पार्टीला 3 ते 11 जागा मिळू शकतात. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहे.
-
इंडिया टुडेचा एक्झिट पोल काय सांगतो?
इंडिया टुडेचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, गुजरातमध्ये भाजपाला 131 ते 151, आपला 9 ते 21 आणि काँग्रेसला 16 ते 30 जागा मिळू शकतात.
-
-
वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला किती जागा ?
टीव्ही ९ नेटवर्कच्या एक्झिट पोलनुसार, हिमालच प्रदेशमध्ये काँग्रेसला 31, इंडिया टुडेनुसार 30-40, आर.पीएमएआरक्यूनुसार 28-33, टाइम्सनाऊ-नवभारतनुसार 24-32, इंडिया टीव्हीनुसार 26-31 जागा मिळू शकतात.
-
हिमाचल प्रेदशसाठी वेगवेगळ्या एक्झिट पोलचा अंदाज काय?
टीव्ही ९ नेटवर्कच्या एक्झिट पोलनुसार, हिमालच प्रदेशमध्ये भाजपाला 33, इंडिया टुडेनुसार 24-34, आर.पीएमएआरक्यूनुसार 34-39, टाइम्सनाऊ-नवभारतनुसार 34-42, इंडिया टीव्हीनुसार 35-40 जागा मिळू शकतात.
-
एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर भाजपा नेत्याची पहिली प्रतिक्रिया
गुजरातमध्ये विक्रमी जागा जिंकून भाजपा सरकार स्थापन करेल, गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचं विधान.
BJP will form the government with a record number of seats in Gujarat: State BJP Chief CR Patil#GujaratAssemblyPolls pic.twitter.com/U1oNtlWzTQ
— ANI (@ANI) December 5, 2022
-
-
उत्तर गुजरातमध्ये भाजपाला किती टक्के वोट शेयर?
उत्तर गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूम 32 जागा आहेत. एबीपी सी-वोटरनुसार भाजपाला इथे 48%, काँग्रेसला 40% आणि आपला 8% वोट शेयर मिळू शकतो.
-
या एक्झिट पोलने भाजपाला दिल्या सर्वात जास्त जागा
न्यूजएक्सच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपाला 117 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 34 ते 51 आणि आपला 6 ते 13 मिळण्याचा अंदाज आहे.
-
रिपब्लिक-पीएलएआरक्यूचा एक्झिट पोल काय सांगतो?
रिपब्लिक-पीएलएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला 128 ते 148 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 30 ते 42 आणि आपला 2 ते 10 जागा मिळतील असा अंदाज आहे.
-
हिमाचल प्रदेशमधूनही भाजपासाठी गुड न्यूज
गुजरात पाठोपाठ हिमाचल प्रदेशमधूनही भाजपासाठी गुड न्यूज आहे. रिपब्लिक-पीएलएआरक्यूने हिमाचल प्रदेशसाठीचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर केलेत. रिपब्लिक-पीएलएआरक्यूनुसार हिमाचल प्रदेशमध्येही भाजपा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये भाजपा 34 ते 39, काँग्रेसला 28 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे.
-
गुजरातमध्ये कोणाला किती जागा मिळणार, जाणून घ्या
गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये भाजपाला 125 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील. आम आदमी पार्टीला फक्त 3 ते 7 जागांवर समाधान मानव लागेल. अन्य 3 ते 7 जागांवर विजय होऊ शकतात.
-
TV9 Exit Poll चे आकडे आले समोर
गुजरातसाठी TV9 ने केलेल्या Exit Poll चे आकडे समोर आले आहेत. गुजरातमध्ये भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करु शकते.
-
टाइम्स नाऊचा Exit poll काय सांगतो?
टाइम्स नाऊच्या Exit poll नुसार, दिल्ली MCD मध्ये आपला 146-156, भाजपाला 84-94 आणि काँग्रेसला 6-10 दरम्यान जागा मिळू शकतात.
-
दिल्ली MCD निवडणुकीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार?
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार MCD निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठा पक्ष ठरु शकतो. आपला 149 ते 171 दरम्यान जागा मिळू शकतात. भाजपाला 69 ते 91 दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला फक्त 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागू शकते.
-
केजरीवाल भाजपाला देणार झटका
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल अंदाजानुसार, दिल्ली एमसीडी निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी भाजपाला झटका देऊ शकते.
-
गुजरातमध्ये विधानसभेच्या किती जागा?
गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. सोमवारी 90 पेक्षा जास्त जागांवर मतदान झालं.
-
2017 साली गुजरातमध्ये भाजपाने किती जागा जिंकल्या?
2017 विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपाने 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. त्याशिवाय 3 जागांवर अपक्ष, 2 जागांवर भारतीय ट्रायबल पार्टी आणि 1 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता.
-
गुजरातमध्ये किती टक्के मतदान?
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याच मतदान पूर्ण. गुजरातमध्ये 5 वाजेपर्यंत 58.70 टक्के मतदान. 8 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल.
-
पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष VVIP – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुजरातमधील दुसऱ्या फेजच्या मतदानावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मतदानाच्या दिवशी रोड शो ला परवानगी नाहीय. पण पंतप्रधान मोदी आणि त्याचा पक्ष VVIP आहे. ते काहीही करु शकतात. त्यांना कोणी विचारणार नाही.
-
गुजरातचा कौल कुणाला?
गुजरातच्या जनतेचा कौल कुठल्या पक्षाकडे आहे, ते एक्झिट पोलमधून थोड्याचवेळात समजेल.
Published On - Dec 05,2022 5:36 PM