Rivaba Jadeja: रवींद्र जाडेजाच्या बायकोच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार? काय आहे स्टेटस?
Rivaba Jadeja: रिवाबा जाडेजा निवडणूक लढवत असलेल्या जामनगर उत्तरमध्ये मतमोजणीची काय स्थिती आहे?
जामनगर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होईल असं दिसतय.
जामनगर उत्तरमध्ये काय स्थिती?
सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा 149 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 20 आणि आम आदमी पार्टी 8 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातच्या या निवडणुकीत काही हाय प्रोफाइल लढतींकडे विशेष लक्ष आहे. यात जामनगर उत्तरची एक निवडणूक आहे.
रवींद्र जाडेजाची बायको निवडणूक रिंगणात
इथून भाजपाने प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाला उमेदवारी दिली आहे. रिवाबाच्या प्रचारासाठी स्वत: रवींद्र जाडेजा मैदानात उतरला होता. जामनगरच्या गल्लीबोळात फिरुन त्यांनी प्रचार केला. आज निकालाचा दिवस आहे. जामनगरच्या मतमोजणीकडे सर्वांचच लक्ष आहे.
सध्याच स्टेटस काय?
जामनगर उत्तरमध्ये काँग्रेस, आप आणि भाजपा असा तिहेरी सामना आहे. काँग्रेसने इथून बिपेंद्रसिंह जडेजा यांना तिकीट दिलं आहे. सध्या मतमोजणीचे जे कलं आहेत, त्यानुसार रिवाबा जाडेजा 12 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे रिवाबा जामनगर उत्तरमधून मोठा विजय मिळवण्याची शक्यता आहे.