Haryana Election Result 2024 : 10 वर्षापासूनची सत्ताविरोधी लाट असूनही या 3 फॅक्टरनी भाजपाला हरियाणात तारलं
Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल सगळ्यांनाच धक्का देणारे आहेत. एक्झिट पोलचे आकडे सपशेल चुकल्याच दिसत आहे. हरियाणात भाजपा जवळपास 50 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताविरोधी लाट भाजपाने कशी रोखली? ते या 3 फॅक्टरमधून समजून घ्या.
हरियाणामध्ये मोठा उलटफेर दिसून आलाय. एक्झिट पोलचे आकडे चुकले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काँग्रेसने बहुमतापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती. पण त्यानंतर अचानक आकडे बदलले. सलग 10 वर्ष सत्तेत असल्यामुळे भाजपा विरोधात सत्ता विरोधी लाट होती. मात्र, असं असूनही निकाल भाजपाच्या बाजून येत असल्याच दिसतय. हे कशामुळे होतय? भाजपाच कोणतं नरेटिव चाललं? एक्झिट पोल्स कसे चुकले? जाणून घ्या.
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपासाठी ठरल्या फायद्याच्या
भाजपाने निवडणुकीत सर्वाधिक उचलला कुमारी शैलजाचा मुद्दा. कुमारी शैलजा यांना इच्छा असूनही विधानसभेच तिकीट मिळालं नाही. त्यांच्या जवळच्या माणसांना कमी तिकीटं मिळाली. त्यातून भाजपाने काँग्रेस दलित नेत्यांचा आदर करत नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशाऱ्यांमध्ये या मुद्यावरुन वार केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलणार असं नरेटिव सेट केलेलं. भाजपाने शैलजाच्या निमित्ताने काऊंटर नेरटिव सेट केलं. भाजपाने तिसऱ्यांदा हरियाणात सरकार स्थापन केलं, तर ते दलितांना आपल्याकडे आणण्यात यशस्वी ठरले असं म्हणता येईल.
खर्ची-पर्ची मुद्याला यश
भाजपाने नोकरीत खर्ची आणि पर्चीचा कथित ट्रेंड बंद करण्याचा मुद्दा उचलला. भाजपाने खर्ची-पर्ची मुद्यावरुन भुपेंद्र हुड्डा यांना घेरलं. हुड्डा यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात खर्ची म्हणजे पैसे देऊन आणि पर्ची म्हणजे शिफारशीच्या आधारावर नोकऱ्या दिल्याचा मुद्दा लावून धरला. भाजपाचा दावा होता की, त्यांच्या 10 वर्षांच्या शासन काळात नोकऱ्या पैसे न घेता आणि कुठल्याही वर्गासोबत भेदभाव न करता दिल्या. जनतेमध्ये या नरेटिवची चर्चा झाली.
मुख्यमंत्री बदलाची चाल यशस्वी
मनोहरलाल खट्टर जवळपास 10 वर्ष हरियाणाचे मुख्यमंत्री होते. पंजाबी चेहरा म्हणून त्यांना प्रमोट करण्यात आलं. जाट विरुद्ध नॉन जाट या नरेटिवद्वारे त्यांना खुर्चीवर कायम ठेवण्यात आलं. मात्र, निवडणुकीच्या काही महिने आधी हटवण्यात आलं. त्यांच्याजाही ओबीसी चेहरा नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. ही चाल सुद्धा जाट विरुद्ध नॉन जाट अशीच होती. ओबीसी प्राथमिकता असल्याचा संदेश दिला. निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यास ही चाल यशस्वी ठरली अस म्हणता येईल.