Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे विधानसभा निवडणुकीत विजयी
Himachal Pradesh Election Result 2022: 50 वर्षांपासून त्यांचं कुटुंब राजकारणात सक्रीय आहे.
मुंबई: आज दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल जाहीर झाले. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र सत्ताबदलाचा ट्रेंड कायम आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दर पाचवर्षांनी आलटून-पालटून भाजपा-काँग्रेसच सरकार येत असतं. याखेपेला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.
सलमान खानशी कनेक्शन
काँग्रेसने 40 आणि भाजपाने 25 जागा जिंकल्या आहेत. सकाळी निकालाचा ट्रेंड सुरु झाला, तेव्हा काहीतास भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटी-तटीचा सामना सुरु होता. पण दुपारी 12 नंतर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाच सलमान खानशी एक कनेक्शन आहे.
इन्स्टाग्रामवरुन वडिलांना शुभेच्छा दिल्या
सलमान खानच्या बहिणीचे सासरे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा सलमान खानची बहिण अर्पिता बरोबर लग्न केलय. आयुषने हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरुन वडिलांना शुभेच्छा दिल्या.
मतदारांचे आभार मानले
आयुषचे वडिल अनिल शर्मा भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून त्यांनी निवडणूक जिंकली. वडिलांच्या विजयाने आनंदीत झालेल्या आयुषने मतदारांचे आभार मानले. आयुषने वडिलांच्या विजयाच सेलिब्रेशन सुरु असल्याचा व्हिडिओ शेअर केला.
राजकारणात या कुटुंबाच एक वेगळं स्थान
आयुष राजकीय कुटुंबातून येतो. माजी दूरसंचार मंत्री सुख राम शर्मा यांचा तो नातू आहे. शर्मा कुटुंबाला राजकारणात सक्रीय राहून 50 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. हिमाचलच्या राजकारणात या कुटुंबाच एक वेगळं स्थान आहे.