गोव्यात काँग्रेसला भाजपाची धास्ती, निकालापुर्वीचं मोर्चेबांधणीला सुरूवात; सतेज पाटील महत्त्वाची भूमिका निभावणार
गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान झालं. गोव्यातल्या 40 जागांसाठी मतदान झालं, सगळीकडे अगदी शांततेत मतदान झाल्याचं पाहायला मिळालं यावर्षी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी गोव्यात तळ ठोकल्याने गोव्यात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे
गोवा – मागच्या 5 वर्षाची पुनरावृत्ती गोव्यात (GOA)व्हायला नको, म्हणून काँग्रेसकडून (congress) निकाला आगोदरचं गोव्यात आपल्या आमदारांची काळजी घ्यायला सुरूवात केली आहे. मागच्यावेळी एक नंबरचा पक्ष असूनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरलेल्या काँग्रेसला भाजपाची (BJP) धास्ती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासून प्रत्येक आमदाराच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं असून मोर्चेबांधणीला सुरूवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते-मंत्री सतेज पाटील यांच्याकडे निकालाच्या दिवसापासून ही जबाबदारी देण्यात आली असून ते निकालानंतर नेमकी काय भूमिका घेतात याकडे देशाचं लक्ष असेल. गेल्यावेळी भाजपाने दाखवलेल्या चतुराईमुळे तिथं त्यांना सत्ता मिळाल्याचे पाहायला मिळाले. पण प्रत्येक पक्ष जागृत असून तिथं काय होणार या पाहण उत्सुक्याचं ठरेल असं वाटतंय.
महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी ठिय्या केल्याचा फायदा होईल का ?
गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान झालं. गोव्यातल्या 40 जागांसाठी मतदान झालं, सगळीकडे अगदी शांततेत मतदान झाल्याचं पाहायला मिळालं यावर्षी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी गोव्यात तळ ठोकल्याने गोव्यात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपाची सगळी जबाबदारी गोव्यात देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली होती. तर शिवसेनेची सगळी जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे होती. त्यामुळे प्रचारा दरम्यानं तिथं टिका टिपणी जोरात करण्यात आली. भाजपाने अनेक उमेदवारांना डावलल्याने निकालावर त्याचा काय परिणाम होणार का ? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. गोवा राज्यात 11 लाख मतदार आहेत, ते कुणाला पसंती दर्शवितात हे निकाला दिवशी जाहीर होईल.
75 टक्के वाढल्याने विजय कुणाचा होईल याकडे सगळ्यांचे लक्ष
गोव्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75 टक्के मतदान झाले असल्याने तिथं निकाल कुणाच्या बाजूने लागेल याबाबत जरी साशंकता असली तरी काँग्रेसच्या अधिक जागा येतील अशी त्यांना शक्यता वाटत असल्याने मोर्चेबांधणीला सुरूवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्यात मतदान झाल्यापासून प्रत्येक आमदारावरती काँग्रेसपक्षाने बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे पाहायला मिळत आहे. 40 जागांसाठी मतदान झाल्याने गोव्यात भाजपाला 22 हून अधिक जागा मिळतील असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. गोव्यात 2017 ला ज्यावेळी निवडणुक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे अधिक उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसला 17 जागांवरती विजय मिळाला होता. तर भाजपाला 13 जागांवरती विजय मिळवला होता. पण भाजपाने दाखवलेल्या चतुराई पणामुळे तिथं भाजपाचं सरकार स्थापन झालं होतं.