जम्मू काश्मीर-हरियाणा निवडणूक निकाल 2024 LIVE : मोठा उलटफेर, हरियाणात चित्र बदललं, आता अशी स्थिती

| Updated on: Oct 08, 2024 | 9:54 AM

Jammu and Kashmir Haryana Assembly Election Results 2024 LIVE Counting and Updates : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दोन्ही राज्यात विधानसभेच्या 90-90 जागा आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे. प्राथमिक कल आलेत त्यानुसार, हरियाणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असं दिसतय. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीवर आहे. निवडणुकीचे निकाल आणि मतमोजणीचे अपडेट्स जाणून घ्या....

जम्मू काश्मीर-हरियाणा निवडणूक निकाल 2024 LIVE : मोठा उलटफेर, हरियाणात चित्र बदललं, आता अशी स्थिती
Jammu and Kashmir Haryana Election Result 2024

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Oct 2024 09:53 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसला धक्का, चित्र पालटलं

    हरियाणात मतमोजणी रंगतदार बनली आहे. पहिल्या तासाभरात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार असं दिसत होतं. पण अचानक चित्र पालटलं आहे. भाजपा आता काँग्रेसच्या पुढे निघून गेली आहे. भाजपा 38 तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे.

  • 08 Oct 2024 09:36 AM (IST)

    J&K Election Result 2024 : आर्टिकल 370 हटवल्यानंतर पहिली निवडणूक, काश्मीरमध्ये काय स्थिती?

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस तब्बल 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 27, पीडीपी 3 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 09:32 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : हरियाणातील महत्त्वाच्या मतदारसंघात काय स्थिती?

    मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा क्षेत्रातून आघाडीवर

    जुलानामधून विनेश फोगाट आघाडीवर

    अंबाला कँटमधून अनिव विज पुढे

    कैथलमधून आदित्य सुरजेवाला आघाडीवर

    रानियामधून अर्जुन चौटाला आघाडीवर

    गढी सांपला-किलोईमधून भूपेंद्र सिंह हुड्डा पुढे

    तोशाममधून श्रुती चौधरी आघाडीवर

    हरियाणाच्या इंदरवालमधून अपक्ष उमेदवार जीएम सरूरी आघाडीवर.

  • 08 Oct 2024 09:26 AM (IST)

    J&K Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची स्थिती काय?

    जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाला 30 जागांची आघाडी मिळाली आहे. पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 09:20 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : हरियाणात सर्व 90 जागांचे कल हाती, अशी आहे स्थिती

    हरियाणामध्ये सर्वच्या सर्व 90 जागांचे कल हाती आले आहेत. हरियाणात काँग्रेस 65 तर भाजपा 21 जागांवर आघाडीवर आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. हरियाणात भाजपा एकतर्फी विजय मिळवणार असं चित्र दिसतय.

  • 08 Oct 2024 09:12 AM (IST)

    J&K Election Result 2024 : ओमर अब्दुल्ला आघाडीवर

    नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला गंदरबाल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. हरियाणामधून मुख्यमंत्री नायाब सैनी पुढे आहेत. अंबाला कँटमधून अनिल विज पुढे आहेत.

  • 08 Oct 2024 08:57 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर मिठाई वाटप सुरु

    हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यात मतमोजणी सुरु आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच सरकार येण्याची चिन्ह आहेत. विजयाच्या शक्यतेमुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात आहेत. दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर मिठाई वाटप सुरु झालय. हरियाणात प्राथमिक कलांमध्ये काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.

  • 08 Oct 2024 08:53 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : हरियाणामध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत

    हरियाणामध्ये परिवर्तनाची लाट आहे. काँग्रेसची प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. काँग्रेस 63, भाजपा फक्त 16 जागांवर आघाडीवर आहे. 90 पैकी 85 जागांचे कल आले आहेत.

  • 08 Oct 2024 08:48 AM (IST)

    J&K Election Result 2024 : काश्मीरमध्ये कोण बहुमताच्याजवळ?

    जम्मू-काश्मीरच्या जनतेने नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला कौल दिला आहे. NC-काँग्रेस जवळपास 45 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे.

  • 08 Oct 2024 08:44 AM (IST)

    J&K Election Result 2024 : ओमर अब्दुल्ला असं का म्हणाले?

    “प्राथमिक कल मला सांगू नका. मागच्यावेळी प्राथमिक कल आले तेव्हा मी आघाडीवर होतो. पण नंतर पिछाडीवर गेलो. लंच झाल्यानंतर आपण बोलू” असं नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख ओमर अब्दुल्ला म्हणाले. ते बडगाम आणि बंदरगालमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

  • 08 Oct 2024 08:40 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : विनेश फोगाटची आघाडी की पिछाडी?

    प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाट जुलानामधून आघाडीवर आहेत. त्या काँग्रेस उमेदवार आहेत. जाट मतदारांचा प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शेतकऱ्यांची नाराजी होती.

  • 08 Oct 2024 08:29 AM (IST)

    Haryana Election Result 2024 : हरियाणामध्ये काँग्रेसच तुफान

    हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. प्राथमिक कल आहेत त्यामध्ये, काँग्रेसच तुफान आलय. काँग्रेस 40 पेक्षा जास्त आणि भाजपा 16 जागांवर आघाडीवर आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. 10 वर्षानंतर हरियाणामध्ये सत्ता पालट होणार असं चित्र दिसतय.

  • 08 Oct 2024 08:26 AM (IST)

    J&K Election Result 2024 : काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसला आघाडी

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. प्राथमिक कल आहेत त्यानुसार, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसला 34 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपा 19, पीडीपी 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 08:08 AM (IST)

    पोस्टल मतमोजणीला सुरूवात, हरियाणामध्ये पहिला कल हाती, कोण आघाडीवर ?

    हरियाणामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. काँग्रेस 5 तर भाजप 1 जागांवर आघाडीवर दिसत आहे.

  • 08 Oct 2024 08:02 AM (IST)

    Haryana Elections Result : हरियाणात पोस्टल मतमोजणीला सुरुवात

    Haryana Elections Result 2024 : हरियाणामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच पहिला कल हाती येणार आहे.

  • 08 Oct 2024 08:01 AM (IST)

    Assembly Election Result : निकालापूर्वी काँग्रेसमध्ये जल्लोष, दिल्लीत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    निकाल जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.

  • 08 Oct 2024 07:48 AM (IST)

    Assembly Election Results: भाजपची एकतर्फी सरकार येणार – नायब सिंग सैनी यांचं वक्तव्य

    निकाल जाहिर होण्याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचं मोठं वक्तव्य… भाजपची एकतर्फी सरकार येणार…

  • 08 Oct 2024 07:38 AM (IST)

    Assembly Election Results: 2014 नंतर जम्मू कश्मीरमध्ये निवडणूक

    जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. म्हणून यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने लढत आहेत. तर भाजप एकट्याने निवडणूक लढवत आहे.

  • 08 Oct 2024 07:08 AM (IST)

    Assembly Election Results: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आलं हवन

    जम्मू काश्मीर भाजपचे अध्यक्ष आणि नौशेराचे उमेदवार रवींद्र रैना यांनी निकालापूर्वी हवन केलं आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून हाती येणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 नंतर आज देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर ही ती दोन राज्य आहेत. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. मागच्या 10 वर्षांपासून हरियाणामध्ये भाजपाची सत्ता आहे. हरियाणामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीशिवाय जेजेपीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. विविध एक्झिट पोलच्या चाचण्यांनी हरियाणात काँग्रेसच सरकार येणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता एक्झिट पोलचे अंदाज अचूक ठरतात की, सगळ्यांचे अंदाज चुकणार ते पुढच्या काही तासात स्पष्ट होईलच.

आर्टिकल 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसची युती होती. परंतु महबूबा मुक्ती यांची पीडीपी आणि भाजप स्वबळावर रिंगणात उतरले होते. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस युतीला काश्मीरमध्ये आणि भाजपाला जम्मूमध्ये जास्त जागा मिळू शकतात. आता निकाल काय लागतात ते थोड्यावेळात स्पष्ट होईलच. काश्मीरच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष आहे.

Published On - Oct 08,2024 7:00 AM

Follow us
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.