Karnataka Election Results 2023 : आरा रा रा खतरनाक अवस्था, भाजपच्या पारड्यात फक्त 73 जागा; आठही मंत्री पिछाडीवर

कर्नाटकात सत्ता आल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे. काँग्रेसच्या दिल्ली येथील मुख्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर कर्नाटकात काँग्रेस नेते, कार्यकर्ते मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करत आहेत.

Karnataka Election Results 2023 : आरा रा रा खतरनाक अवस्था, भाजपच्या पारड्यात फक्त 73 जागा; आठही मंत्री पिछाडीवर
karnataka election resultsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 11:23 AM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भाजपला सत्तेतून जावं लागल्याचं चित्र आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा प्रचंड पराभव होताना दिसत आहे. गेल्यावेळी 104 जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत 69 जागांवरच आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे आठ मंत्रीही पिछाडीवर आहेत.

कर्नाटकातील कल पाहता भाजपला 69, काँग्रेसला 120 आमि जेडीएसला 26 जागा मिळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसमधील उमेदवारांमधील मतांचं अंतरही खूप वाढलं आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी होताना दिसत आहे. सध्या भाजपचे आठ मंत्री पिछाडीवर आहेत. बी श्रीरामुलु (बेल्लारी ग्रामीण), जेसी मधुस्वामी (चिक्कनायकनहल्ली), मुरुगेश निराणी (बिलगी), बीसी नागेश (त्रिपतुर), गोविंद करजोल (मुधौल), व्ही सोमाना (वरुणा आणि चमराजनगर), के सुधाकर (चिक्कबल्लापूर) आणि शशिकल्ला जोले (निप्पानी) आदी मंत्री पिछाडीवर आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघात सिद्धारमैय्या हे आघाडीवर आहेत. सध्या ते मतदान केंद्रावर जायला निघाले आहेत.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये

पक्षाला प्रचंड यश मिळाल्यानंतर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. बेळगाव, धारवाड आणि हुबळीत काँग्रेसने हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत. या ठिकाणाहून आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. तसेच उद्या 12 वाजता काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार बनवण्यावर चर्चा होणार आहे.

काँग्रेसची दिवाळी

विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांच्या घरी मिठाईचं वाटप केलं जात आहे.

लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं

काँग्रेसकडे बहुमत आहे. आम्ही प्रचंड विजय मिळवला आहे. 40 टक्के कमिशनवाली सरकारची घोषणा आम्ही दिली होती. लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही हा मुद्दा उचलला होता. लोकांनी तो स्वीकारला आणि काँग्रेसला सत्तेत बसवलं आहे, असं काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.