Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपा पिछाडीवर, पण दुसऱ्या राज्यात बंपर आघाडी

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपाची हार झाली, तरी दुसऱ्या राज्यातून समाधानकारक बतमी. कर्नाटकात सत्ता बदलाचा जनतेचा कौल दिसतोय. एक्झिट पोलमधून जे अंदाज वर्तवण्यात आले होते, निकालाचा कल सुद्धा तसाच दिसतोय.

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपा पिछाडीवर, पण दुसऱ्या राज्यात बंपर आघाडी
Karnataka Assembly election result 2023Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 10:17 AM

लखनौ : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतायत. कर्नाटकात मतमोजणी सुरु आहे. कर्नाटकात प्रारंभीचे जे कल आहेत, त्यानुसार काँग्रेसकडे आघाडी आहे. कर्नाटकात काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तेच भाजपा 75 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 25-30 मतदारंसघात आघाडीवर आहे. कर्नाटकात कोण सरकार बनवणार? ते आताच ठामपणे सांगता येणार नाही. पण काँग्रेसकडे संधी जास्त आहे.

कर्नाटकात जनता आलटून-पालटून कौल देत असते. आताही तोच ट्रेंड कायम आहे. कर्नाटकाच चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. पण त्याचवेळी दुसऱ्या एका राज्यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ही त्यातल्या त्यात भाजपासाठी समाधानाची बाब आहे.

भाजपाकडे कुठे बंपर आघाडी?

उत्तर प्रदेशात 760 महापालिकांसाठी मतमोजणी सुरु आहे. या महापालिका निवडणुकीत 17 महापौर पदांच्या जागा आहेत. भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्रत्येकी एक-एक सीटवर आघाडीवर आहेत.

कुठे होतेय निवडणूक?

उत्तर प्रदेशात आगरा, झांसी, शाहजहांपुर, फिरोजाबाद, सहारनपुर, मेरठ, लखनऊ, कानपूर, गाजियाबाद, वाराणसी, प्रयागराज, अलीगढ़, बरेली, मुरादाबाद, गोरखपुर, अयोध्या, मथुरा-वृंदावन या ठिकाणी महापौर पदासाठी निवडणूक झाली. कुठल्या पदांसाठी झालं मतदान

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 17 महापौर, 1420 नगरसेवक, नगर परिषदांचे 199 अध्यक्ष, नगर पालिका परिषदांचे 5327 सदस्य, नगर पंचायतीचे 544 अध्यक्ष आणि नगर पंचायतीच्या 7178 सदस्यांच्या निवडीसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणुकीत 17 महापौर, 1401 नगरसेवक निवडीसाठी मतदान झालं. 19 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात 4 मे आणि 11 मे रोजी मतदान झालं होतं.

Non Stop LIVE Update
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण.
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा.
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी.
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?.
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?.
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.