केरळमध्ये भाजपला मतदान का होत नाही?; भाजप नेत्याचं उत्तर वाचाल तर चक्रावून जाल

भाजपला केरळमधील लोक मतदान का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर खुद्द भाजपच्या नेत्यानेच दिलं आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

केरळमध्ये भाजपला मतदान का होत नाही?; भाजप नेत्याचं उत्तर वाचाल तर चक्रावून जाल
O Rajagopal
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 1:06 PM

तिरुवनंतपूरम: भाजपला केरळमधील लोक मतदान का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर खुद्द भाजपच्या नेत्यानेच दिलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केरळमधील एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे. केरळमध्ये शिकलेले लोक अधिक आहेत. हे शिकलेले लोक भाजपला मतदान करत नाहीत, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलं. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजगोपाल यांनी हे विधान केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राजगोपाल यांनी हा खुलासा केला आहे. हरियाणा आणि त्रिपुरामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या आणि पश्चिम बंगालमध्ये एक मुख्य राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपला केरळमध्ये अस्तित्व निर्माण का करता आलं नाही? असा सवाल राजगोपाल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, केरळमध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आहे. येथील लोक शिकलेले आहेत. ते मतदान करण्यापूर्वी विचार करतात आणि तर्क लावतात. त्यानंतरच ते मतदान करतात असं राजगोपाल यांनी म्हटलं आहे.

शिकलेल्या लोकांची सवय

केरळ हे वेगळं राज्य आहे. दोन तीन कारणांनी हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं ठरतं. केरळमधील साक्षरतेचं प्रमाण 90 टक्के आहे. येथील लोक विचार करतात. तर्क लढवतात. शिकलेल्या लोकांची ही सवय असते, हा सुद्धा एक मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

हिंदू-अल्पसंख्याकांची लोकसंख्या समान

दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आणि 45 टक्के अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणं जुळवणं शक्य होत नाही. त्यामुळेच केरळची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नाही. केरळची परिस्थिती वेगळी असली तरी आम्ही हळूहळू पुढे सरकतो आहोत, पक्ष वाढवण्याचं काम आम्हीही करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

6 एप्रिल रोजी मतदान

केरळच्या 160 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यातील जनता कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे पाहावं लागणार आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

संबंधित बातम्या:

काँग्रेस नेते संघ-भाजपशीही हातमिळवणी करू शकतात; राष्ट्रवादीच्या चाकोंचा दावा

पाच किलो मोफत तांदूळ देणार, पाच लाख घरे बांधणार; काँग्रेस आघाडीचा ‘पिपल्स मेनिफेस्टो’ जारी

‘2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप’, न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात

(Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.