महाराष्ट्र निवडणूक 2024: मतदानाचे किस्से, मतदानासाठी गेलेल्या जिवंत व्यक्तीला दाखवले मृत, या विक्रमविरांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 News in Marathi: नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच लोक रांगेत लागून मतदान करत आहेत. मतदानासाठी समाज सेवक, नेते, सेलिब्रिटीज बाहेर पडले आहे. तसेच विक्रमविरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु जिवंत असलेल्या मतदारास मृत दाखवण्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे.

महाराष्ट्र निवडणूक 2024: मतदानाचे किस्से, मतदानासाठी गेलेल्या जिवंत व्यक्तीला दाखवले मृत, या विक्रमविरांनी बजावला मतदानाचा हक्क
कुठे मतदारास मृत दाखवले, कुठे लागल्या रांगा, जगातील सगळ्यात कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांनी मतदान केले.
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 1:06 PM

विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात सकाळपासून रांगा लागल्या आहेत. मतदानाचा हक्क बजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडले आहेत. १९९९ पासून गेल्या पाच लोकसभा निवडणुकीत नागपुरातील मतदानाचा टक्का ६० टक्क्यांच्या पुढे गेला नाही. यामुळे यावेळेस मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले आहेत. त्याला चांगलेच यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच लोक रांगेत लागून मतदान करत आहेत. मतदानासाठी समाज सेवक, नेते, सेलिब्रिटीज बाहेर पडले आहे. तसेच विक्रमविरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु जिवंत असलेल्या मतदारास मृत दाखवण्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे.

जिवंत असताना मृत्यू दाखवले

रामटेक लोकसभा मतदातसंघात पारशीवनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बूथ क्रमांक 270 वर राजेंद्र खंडाते मतदानासाठी गेले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आल्यामुळे त्यांना धक्का बसला. मतदान केंद्र अधिकाऱ्याला ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय झाला. मात्र जिवंत असताना त्यांचा मृत्यू दाखवण्यात आला. यामुळे मतदार यादी भोंगळ कारभार समोर आला आहे.

जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे मतदान

जगातील सगळ्यात कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यांनी परिवारासह मतदान केले. ज्योती यांच्या नावावर जगातील सगळ्यात कमी उंचीची महिला असल्याची नोंद झाली आहे. रामटेकमध्ये एका तरूण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी, कपाळाला मुंडावळ्या अशा वेशातील एक तरूण मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. स्वप्नील डांगरे असे त्या तरूणाचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

विकास आमटे, सरसंघाचालकांनी केले मतदान

ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांना यांनी आनंदवन येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक निवडणुकीत पहिलं मतदान करण्याचा विकास आमटे त्यांचा शिरस्ता आहे. यावर्षी देखील त्यांनी बरोबर सात वाजता पहिलं मतदान केलं. मतदान आपला हक्क असून प्रत्येकाने तो बजावलाच पाहिजे, असं आवाहन या वेळी त्यांनी केलं. तसेच नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात वाजताच त्यांनी मतदान केले.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....