लोकसभा निवडणूक 2024 : निवडणुकीची अग्निपरीक्षा…या आठ मंत्र्यांसह बड्या 15 नेत्यांचे भवितव्य पणाला
Lok Sabha Election 2024 News in Marathi: 2019 च्या निवडणुकीत या 102 जागांपैकी भाजपने 60 तर काँग्रेसने 65 जागांवर निवडणूक लढवली होती. याशिवाय द्रमुकने 24 जागांवर निवडणूक लढवली होती. गेल्या निवडणुकीत भाजपला 40, काँग्रेसला 15 आणि द्रमुकला 24 जागा मिळाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास आज प्रारंभ झाला. देशभरातील १०२ जागांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ८ केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर मतदान होत आहे. भाजप आणि काँग्रेससाठी हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे.
या नेत्यांच्या मतदार संघात मतदान
मतदान होणाऱ्या बड्या नेत्यांमध्ये नितीन गडकरी (नागपूर), के अन्नामलाई (कोयंबटूर), जितिन प्रसाद (पीलीभीत), जीतन राम मांझी (गया), नकुल नाथ (छिंदवाड़ा), गौरव गोगोई (जोरहाट), इमरान मसूद (सहारनपुर), कार्ति चिदम्बरम (शिवगंगा), तमिलिसाई साउंडराजन (चेन्नई दक्षिण), दयानिधि मारन (चेन्नई सेंट्रल), अर्जुनराम मेघवाल (बीकानेर), भूपेंद्र यादव (अलवर सीट), संजीव बालियान (मुजफ्फरनगर), किरेन रिजिजू (अरुणाचल पश्चिम-अरुणाचल प्रदेश), निसिथ प्रमाणिक (कूचबिहार) यांचा समावेश आहे.
या राज्यांमध्ये मतदान
पहिल्या टप्प्यात ईशान्येकडील सहा राज्ये आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या 9 जागा आहेत. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सर्व 39 जागा आहेत. लक्षद्वीपमध्ये 1 जागा आहे. अरुणाचल प्रदेशमधून 2, बिहारमधून 4, आसाममधून 4, छत्तीसगडमधून 1, मध्य प्रदेशातून 6, महाराष्ट्रातून 5, मणिपूरमधून 2, मेघालयातून 2, मिझोराममधून 1, नागालँडमधून 1, राजस्थानमधून 12, सिक्कीममधून 1, त्रिपुराच्या 1, उत्तर प्रदेशच्या 8, उत्तराखंडच्या 5, पश्चिम बंगालच्या 3, तामिळनाडूच्या 39, अंदमान आणि निकोबारच्या 1, जम्मू-काश्मीरच्या 1, लक्षद्वीपच्या 1 आणि पुद्दुचेरीच्या 1 जागेवर मतदान होत आहे.
102 जागांवर 1625 उमेदवार रिंगणात
पहिल्या टप्प्यातील 102 जागांवर 1625 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 134 महिला उमेदवार आणि 1491 पुरुष उमेदवार आहेत. बीएसपीचे 86, भाजपचे 77, काँग्रेसचे 56, एआयएडीएमकेचे 36, द्रमुकचे 22, टीएमसीचे 5, आरजेडीचे 7, आरएलडीचे 1, एलजेपी (आर) 1 आणि जितन राम मांझी यांचा पक्ष एचएएम कडून एक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
2019 मध्ये काय झाले होते
2019 च्या निवडणुकीत या 102 जागांपैकी भाजपने 60 तर काँग्रेसने 65 जागांवर निवडणूक लढवली होती. याशिवाय द्रमुकने 24 जागांवर निवडणूक लढवली होती. गेल्या निवडणुकीत भाजपला 40, काँग्रेसला 15 आणि द्रमुकला 24 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय बसपने 3 जागा जिंकल्या आणि सपाला 2 जागा मिळाल्या, तर 18 जागा इतर पक्षांनी जिंकल्या. अशा प्रकारे, 102 जागांपैकी यूपीएने 45 आणि एनडीएने 41 जागा जिंकल्या.
निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट वाचा….