Lok Sabha Election 2024 LIVE Updates: गडचिरोलीत सर्वाधिक टक्के मतदान, तर नागपुरात सर्वात कमी टक्के मतदान
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Live News and Updates in Marathi: आज 19 एप्रिल 2024. देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आज सुरुवात झाली. या उत्सवासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. देशातील १०२ जागांवर मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. २१ राज्यांत १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होणार आहे. नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. १८ लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळणार आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होणार आहे. मतदानासंदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा शिंदखेडा तालुक्यात नारळ फुटला
धुळे : सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा शिंदखेडा तालुक्यात नारळ फुटला आहे. यावेळी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार राव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदखेडा तालुक्यात खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. पेडकाई देवी मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
-
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान संपले
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्व विदर्भातील अन्य चार लोकसभा मतदारसंघासह संध्याकाळी सहा वाजता मतदान संपुष्टात आले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 64.84 एवढे मतदान झाले होते. प्रशासनाच्या अनेक प्रयत्नानंतरही पाच वाजेपर्यंत हे मतदान 55.11% एवढे झाले होते. अंतिम आकडेवारी मात्र रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.
-
-
गडचिरोलीत सर्वाधिक टक्के मतदान, तर नागपुरात सर्वात कमी टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७.०० वाजेपासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : रामटेक ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ टक्के भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.
-
बिहार यावेळी धक्कादायक निकाल देईल- तेजस्वी यादव
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आम्ही चारही जागा जिंकत आहोत. लोक मोठ्या संख्येने मतदान करत आहेत. लोक सध्याच्या सरकारवर नाराज आहेत. बिहार यावेळी धक्कादायक निकाल देईल.
-
त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.35 टक्के मतदान
त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.35% मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक मतदान झाले.
-
-
पंतप्रधान मोदींची २९ तारखेला पुण्यात जाहीर सभा
पंतप्रधान मोदी यांची २९ तारखेला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार सभा.
-
उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांच्या रांगा कमी झाल्या
उन्हाचा पारा वाढल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी मतदारांच्या रांगा कमी झाल्या आहेत. सकाळी लोकं मतदानाला बाहेर पडले होते पण दुपारनंतर रांगा कमी झाल्या आहेत. 4 वाजेनंतर पुन्हा मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता.
-
दुपारी १ वाजेपर्यंतचे मतदान नागपुरात २८.७५ % मतदान
नागपुरात दुपारी १ वाजेपर्यंतचे २८.७५ % मतदान तर रामटेकमध्ये २८.७३ % मतदानाची नोंद
-
सुनील चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील मालक चव्हाण महायुतीच्या रॅलीत सहभागी. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे चव्हाण उपस्थिती, सोबत मल्हार पाटील
-
नारायण राणे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन
नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन नारायण राणे यांच्याकडून केले जात आहे.
-
थोड्याच वेळात शरद पवार अहमदनगर येथे दाखल होणार
नगर शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर हेलिपॅड वर शरद पवारांचं आगमन होणार आहे. निलेश लंके यांच्या साठी शरद पवार मैदानात, दिवसभर बैठकानंच सत्र
-
भारती पवार यांचे मोठे विधान
जनतेचा विश्वास पुन्हा एकदा मोदीजींवर आहे, भारतातील एकही गाव असं नाही की जिथे आमच्या योजना पोहोचलेल्या नाही, भारती पवार
-
अरुणाचल प्रदेशमध्ये 15% मतदान
अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत 15% मतदान झाले. तसेच विधानसभा निवडणुकीत सकाळी 7 ते 10 या वेळेत 20% मतदान झाले. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 50 आणि लोकसभेच्या 2 जागांसाठी मतदान होत आहे.
-
कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मतदान
गडचिरोली कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी तालुक्यातील चिंतनपेठ येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदानाच्या दिवस आहे, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले
-
मी चांगल्या फरकाने जिंकेन असा मला 101% विश्वास- नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि नागपुरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी म्हणाले, “आपण आज लोकशाहीचा सण साजरा करत आहोत. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. हा आपला मूलभूत अधिकार आणि कर्तव्यही आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता, पण तुमचं मत देणं महत्त्वाचं आहे. मला 101% विश्वास आहे की मी चांगल्या फरकाने जिंकेन.”
-
पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात पहिल्या दोन तासात 7.28 टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालं आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7.28 टक्के मतदान झालं आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी:
रामटेक- 5.82 टक्के नागपूर- 7.73 टक्के भंडारा- गोंदिया- 7.22 टक्के गडचिरोली- चिमूर 8.43 टक्के चंद्रपूर- 7.44 टक्के
-
सदगुरू जग्गी वासुदेव यांनी बजावला मतदानाचा हक्क
तामिळनाडू: कोईम्बतूर इथं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी मतदान केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
#WATCH | Tamil Nadu: Sadhguru Jaggi Vasudev casts his vote for the first phase of #LokSabhaElections2024 in Coimbatore. pic.twitter.com/VZ5A4FNXvT
— ANI (@ANI) April 19, 2024
-
नितीन गडकरींचं नागपुरातील मतदारांना विशेष आवाहन
केंद्रीय मंत्री आणि नागपुरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आपण देशातील सर्वात मोठा सण अत्यंत उत्साहात साजरा करत आहोत. नागपुरात मी विशेषत: मतदारांना आवाहन करेन की इथं तापमान जास्त आहे, त्यामुळे त्यांनी लवकर मतदानासाठी यावं. गेल्या वेळी 54 टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदानाची टक्केवारी 75 टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे.” नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेस नेते विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
-
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
नागपूर: महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी कोराडी ग्रामपंचायत कार्यालय मतदान केंद्रावर मतदान केलं.
#WATCH | Nagpur: Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule casts his vote for the first phase of #LokSabhaElections2024 at Koradi Gram panchayat office polling booth. pic.twitter.com/TU7gWbr6GJ
— ANI (@ANI) April 19, 2024
-
कमल हासन मतदान केंद्रावर पोहोचले
तामिळनाडू: अभिनेते आणि MNM प्रमुख कमल हासन हे चेन्नईच्या कोयंबेडू इथल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले आहेत. मक्कल नीधी मैयम (MNM) निवडणूक लढवत नसले तरी पक्षाने DMK ला पाठिंबा दिला आणि प्रचार केला.
#WATCH | Tamil Nadu: Actor and MNM chief Kamal Haasan arrives at a polling booth in Koyambedu, Chennai to cast his vote.
Makkal Needhi Maiam (MNM) is not contesting the #LokSabhaElections2024, the party supported and campaigned for DMK. pic.twitter.com/q1bizg3Wey
— ANI (@ANI) April 19, 2024
-
Maharashtra Elections 2024 : सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान
रामटेक – 5.82 टक्के
चंद्रपूर – 7.44 टक्के
गडचिरोली चिमुर – 8.43
भंडारा गोंदिया – 7.22 टक्के
नागपूर – 6.41 टक्के
-
लोकसभा निवडणूक 2024 : पूर्व विदर्भात अशी आहे लढत
>> नागपुरात भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत
>> चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर
>> रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्याम बर्वे, महायुतीचे राजू पारवे आणि वंचितचे किशोर गजभिये
>> गडचिरोली-चिमूरमध्ये महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते आणि वंचितचे हितेश मडावी.
>> भंडारा-गोंदियात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवट
-
Maharashtra Elections 2024 : मतदाराजाचा अभूतपूर्व उत्साह
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासूनच मतदान सुरु. सकाळी सात वाजेपासून मतदार राजा मतदान केंद्रावर अधिकार बजाविण्यासाठी हजर झाला. नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार आहेत. रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र आहेत.
-
Lok Sabha Election 2024 : २२ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती
जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हाती घेण्यात आली आहे. यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 65 लाख मतदारांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. यामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त महिला मतदार आहेत तेथील मतदान केंद्राची संपूर्ण कामकाज महिला करणार आहे .जिल्हाभरात 22 मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा भरात तब्बल सहा हजार 592 मतदान केंद्र निश्चित केले आहेत. त्यापैकी 22 मतदान केंद्रावर अधिकारी ,कर्मचारी ,पोलीस आदी मनुष्यबळ 100 टक्के महिलांचे राहणार आहे.
-
Live Updates : पूर्व विदर्भात लोकशाहीचा उत्सव
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भामधील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यासाठी सर्व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक बंदोबस्त ठेवत आहे.
-
Live Updates : 16.63 कोटी मतदार बजावतील मतदानाचा अधिकार
देशात पहिल्या टप्प्यात 16.63 कोटी मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. 1.87 कोटी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. सर्व मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लोकशाहीचा उत्सव पार पाडण्यासाठी 18 लाख कर्मचारी राबत आहेत.
-
चंद्रपूर – ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूरच्या आनंदवनमध्ये 1200 मतदार बजावणार मतदानाचा हक्क….
चंद्रपूर – ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूरच्या आनंदवन मध्ये 1200 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. आनंदवनसाठी विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. कुष्ठरोगी,दिव्यांग,अबाल वृद्ध,अंध,कर्ण बधिर मतदार बजावत आहे मतदाचा अधिकार बजावतील.
-
नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प केलाय – चंद्रशेखर बावनकुळे
नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प करत महायज्ञ केला आहे. या महायज्ञात मतदानाची आहुती प्रत्येक नागरिकाने द्यावी असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील, विदर्भातील पाचही जागा भाजप जिंकेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
-
चंद्रशेखर बावनकुळेंनी कोराडी मतदार संघात जाऊन केलं मतदान
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून त्यांनी केलं मतदान.
-
भंडारा-गोंदियामधून मविआचे प्रशांत पडोळे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भंडारा-गोंदियामधून मविआचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. पडोळेंनी सहकुटुंब मतदान केले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून असे आवाहन पडोळे यांनी नागरिकांना केले.
-
नागपूर – काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
नागपूरमध्ये लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदानाचे अपील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. १०२ लोकसभा मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा आणि विक्रमी मतदान करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव आज से शुरू हो रहा है! लोकसभा चुनाव के पहले चरण के मतदान में 21 राज्यों और संघ शासित प्रदेशों की 102 सीटों के लिए वोट डाले जाएंगे। इन सभी सीटों के मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे अपने मताधिकार का प्रयोग जरूर करें और वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं। पहली बार…
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2024
-
प्रतिभा धानोरकर यांचे मतदान
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूरच्या वरोरा शहरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत आहे.
-
आमदार राजू पारवे यांचे मतदान
आमदार राजू पारवे यांनी बजवला मतदानाचा हक्क बजावला. उमरेडच्या परसोडी येथील पंडित नेहरू उच्च प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी मतदान केले.
-
16.86 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार
गेल्या दोन वर्षांपासून आमची तयारी सुरू होती. संवेदनशील मतदान केंद्र आणि मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था पोहोचवणं या सुविधा आम्ही तयार केल्या आहेत. आज जवळपास 16.86 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत .पहिल्या टप्प्यात 1.86 लाख मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. आम्हाला विश्वास आहे मतदार मोठ्या संख्येने मतदानाला सामोरे जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
-
सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर दाखल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सकाळीच नागपूरमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहचले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान आपले कर्तव्य आणि अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.
Published On - Apr 19,2024 7:09 AM