Loksabha Election Result 2024 : इंडिया आघाडीत जाणार का? जेडीयूच्या केसी त्यागी यांचं मोठ विधान

Loksabha Election Result 2024 : इंडिया आघाडीमध्ये आप, काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट आणि अन्य पक्ष आहेत. मतमोजणी सुरु असताना काँग्रेसकडून नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी संपर्क साधण्यात येणार असल्याच बोलल जातय.

Loksabha Election Result 2024 : इंडिया आघाडीत जाणार का? जेडीयूच्या केसी त्यागी यांचं मोठ विधान
CM Nitish KumarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 2:18 PM

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. जनतेने आपला कौल दिला आहे. भाजपाचा 400 पारचा नारा अतिशोयक्ती ठरला आहे. प्रत्यक्षात 300 पर्यंत पोहोचतानाही भाजपाची चांगलीच दमछाक झाली आहे. मागच्या दोन अडीच तासांपासून भाजपाप्रणीत एनडीएचा आकडा 290 च्या आसपास घुटमळत आहे. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी 234 पर्यंत पोहोचली आहे. भाजपा 244 जागांवर तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया आघाडीचे जे आकडे वाढलेत, त्यामुळे त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा केला जात आहे. इंडिया आघाडीमध्ये आप, काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट आणि अन्य पक्ष आहेत. मतमोजणी सुरु असताना काँग्रेसकडून नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी संपर्क साधण्यात येणार असल्याच बोलल जातय.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू दोघेही भाजपाप्रणीत एनडीएमध्ये आहेत. त्यांना आघाडीत घेऊन भाजपाला सरकार बनवण्यापासून रोखण्याचा उद्देश आहे. नितीश कुमार यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे मीडियाकडून सातत्याने जेडीयूला काँग्रेसकडे जाणार का? अशी विचारणा केली जात आहे. त्यावर जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जेडीयूच्या नेत्याने काय म्हटलं?

“आम्ही कुठेही जाणार नाही, जिथे आहोत तिथेच राहणार आहोत” असं केसी त्यागी यांनी म्हटलं आहे. भाजपासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. “नितीश कुमार काल डॉक्टरला भेटण्यासाठी दिल्लीला आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली” असं केसी त्यागी म्हणाले. दरम्यान शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.