Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२०२४ लोकसभा निवडणुकीत मध्ये कोणाची हवा ? अमित शाहा यांचा सर्वात मोठा दावा

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये चाचपणी सुरु झाली आहे. केंद्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून सत्तेची गणितं जुळवण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकीत मध्ये कोणाची हवा ? अमित शाहा यांचा सर्वात मोठा दावा
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 10:38 PM

मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका ( Loksabha Election 2024 ) होत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षा ही मागे नाही. भारतीय जनता पक्षाने 2 वर्षापासूनच यासाठी तयारी सुरु केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा अमित शहा हेच मोदींचे सर्वात मोठे स्ट्रॅटेजिस्ट असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी दोन दिवसांच्या ईशान्येच्या दौऱ्यावर असताना आसाममध्ये एका सभेला संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात सर्वात मोठा दावा केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची नेत्रदीपक कामगिरी करेल. आसाममध्ये भाजप 14 पैकी 12 जागा जिंकेल. तर देशभरात भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल आणि मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील असं अमित शहा म्हणाले.

मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. तर इतर दोन राज्यांमध्ये युतीसोबत भाजप सत्तेत सहभागी झाले आहे.

राहुल गांधी यांनी युनायटेड किंग्डम दौऱ्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील अमित शाह यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘परदेशात भारताचा अपमान केला. पण त्यांनी हे असंच सुरु ठेवलं की काँग्रेस केवळ ईशान्येतूनच नाही तर संपूर्ण देशातून नष्ट होईल.’

अमित शाह म्हणाले की, ‘वादग्रस्त सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, 1958, किंवा AFSPA, आसामच्या 70 टक्के भागात रद्द करण्यात आला आहे आणि बोडोलँड आणि कार्बी आंगलाँगमध्ये शांतता पुनर्संचयित झाली आहे. राज्य आणि त्याच्या शेजारील प्रांतांमधील सीमा विवाद मिटला आहे.’

बिहूच्या निमित्ताने गुवाहाटी येथे १४ एप्रिल रोजी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. येथे 11 हजार डान्सर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत परफॉर्म करणार आहेत.

'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.