फक्त 6 जागा जिंकून ‘या’ राज्यात भाजप सत्तेत येणार; राज्यात मोठी खेळी होणार?

लोकसभेसोबत अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीचा निकालही 4 जून रोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोल नुसार आंध्रप्रदेशात सत्तांतर होताना दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आंध्र प्रदेशात सत्तेत येणार असून चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फक्त 6 जागा जिंकून 'या' राज्यात भाजप सत्तेत येणार; राज्यात मोठी खेळी होणार?
नरेंद्र मोदीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 9:55 PM

लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी येणार आहेत. त्यापूर्वीच एक्झिट पोल आले असून त्यात भाजपचंच सरकार येणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही भाजपच्या बाजूने असल्याचं दिसत असून या राज्यात भाजपचं सरकार येताना दिसत आहे. आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकालही एनडीएच्या बाजूनेच येताना दिसत असून आंध्रप्रदेशातही एनडीएचं सरकार येताना दिसत आहे.

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत एकूण 175 जागांपैकी 98 ते 120 जागा एनडीएला मिळताना दिसत आहेत. एनडीएत भाजपसह चंद्रबाबू नायडू यांची तेलुगु देशम पार्टी आणि पवन कल्याण यांची जन सेना पार्टी आहे.

कुणाला किती जागा मिळणार?

एक्झिट पोलनुसार टीडीपीला 78-96 जागा मिळताना दिसत आहे. टीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपला 4-6 जागा मिळताना दिसत आहे. तर पवन कल्याण यांच्या जेएसपीला 16-18 जागा मिळताना दिसत आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला केवळ 55 ते 77 जागा मिळताना दिसत आहे. 2019च्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 151 जागा मिळाल्या होत्या. यावेळी वायएसआर काँग्रेसला सत्तेवरून खाली जावं लागेल अशी शक्यता दिसत आहे. विशेष म्हणजे केवळ सहा जागा असूनही भाजपला आंध्रप्रदेशात सत्ता मिळताना दिसत आहे. अर्थात हा एक्झिट पोलचा अंदाज आहे. येत्या 4 जून रोजी जनतेचा खरा कौल समोर येणार आहे. त्यातच कुणाची सत्ता येणार आणि कुणाची जाणार हे स्पष्ट होणार आहे.

इंडिया आघाडीची वाईट अवस्था

या एक्झिट पोलने मात्र इंडिया आघाडीची अवस्था वाईट होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इंडिया आघाडीला आंध्रप्रदेश विधानसभेत शून्य ते दोन सीट मिळण्याचा अंदाज वर्थवला आहे. इंडिया आघाडीत काँग्रेसने 159, भाकप आणि सीपीएमने प्रत्येकी आठ आठ उमेदवार मैदानात उतरवले होते. मात्र, तरीही इंडिया आघाडीला फारसं यश येताना दिसत नसल्याचं या अंदाजातून स्पष्ट झालं आहे.

2019च्या तुलनेत इंडिया आघाडीला 85 जागा अधिक मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेसच्या जागा कमी होणार आहेत. 2019च्या निवडणुकीत टीडीपी एनडीएचा भाग नव्हता. पवन कल्याण यांची जेएसपी पार्टी सुद्धा नवीनच होती.

एग्जिट पोल के नतीजों से पता चलता है कि एनडीए को 2019 के चुनावों की तुलना में 85 सीटें ज़्यादा मिलेंगी, जबकि वाईएसआरसीपी की सीटों की संख्या घटेगी. गौरतलब है कि 2019 में टीडीपी एनडीए का हिस्सा नहीं थी और अभिनेता से नेता बने पवन कल्याण की जेएसपी नई पार्टी थी.

कुणी किती जागा लढवल्या

एनडीएला या निवडणुकीत पाच टक्के अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला एक टक्का वाढीव मते मिळण्याची शक्यता आहे. वायएसआरसीपीच्या मतांच्या टक्क्यात सहा टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. राज्यात 13 मे रोजी मतदान झालं होतं. वायएसआरसीपीने स्वबळावर 175 जागा लढवल्या होत्या. एनडीएतून टीडीपीने 144, जेएसपीने 21 आमि भाजपने 10 जागांवर उमेदवार दिले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.