Chanakya Maharashtra Exit Polll 2024 : महाराष्ट्रात चाणक्यच्या एक्झिट पोलमुळे मविआच वाढणार टेन्शन
Chanakya Maharashtra Exit Polll 2024 : महाराष्ट्रात चाणक्यच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्राची जनता काय कौल देणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. चाणक्यचा एक्झिट पोल सीवोटर आणि TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्याच मतदान आज संपलं. त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात काय होणार ? याकडे राज्यातील जनतेसह देशातील जाणकारांच लक्ष लागलं आहे. कारण मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. कोण कोणासोबत आहे किंवा कोण कुठे जाईल याचा अंदाज बांधता येत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटले. एक गट सत्ताधारी आघाडीत तर दुसरा विरोधी पक्षात आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता काय कौल देणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे.
आज मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. भाजपाच 45 प्लसच स्वप्न साकार होणार नाही असं दिसतय. पण भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने खूप निराश व्हाव अशी सुद्धा स्थिती नाहीय. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्षाला एक जागा मिळू शकते. यात भाजपाला 18, शिवसेनेला 4, राष्ट्रवादी ००, काँग्रेस 05, ठाकरे गट 14 आणि पवार गटाला 6 जागा मिळण्यााच अंदाज आहे.
सीवोटर एक्झिट पोलचा अंदाज काय?
सीवोटर एक्झिट पोलनुसार महायुतीला 22 ते 26 आणि मविआला 23 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपा 17, शिंदे गट 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे. उद्धव ठाकरे गटाला 9 काँग्रेस 8, शरद पवार गट 6 आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलच भाकीत काय?
न्यूज 24 टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल महाविकास आघाडीच टेन्शन वाढवणारा आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपाप्रणीत NDA ला 33 आणि महाविकास आघाडीला 18 जागा मिळतील असा अंदाज आहे. चाणक्यचा एक्झिट पोल अन्य दोन एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.