बीड लोकसभा मतदारसंघ निकाल 2024 : चुरशीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव

Beed Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या कांटे की टक्कर होती. त्यामुळे कोणाचा विजय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

बीड लोकसभा मतदारसंघ निकाल 2024 : चुरशीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 10:06 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. पंकजा मुंडे यांचा 6,585 मतांनी पराभव झाला आहे. शेवटच्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांना 6,74,984 मते मिळाले. तर बजरंग सोनावणे यांना 6,81,569 मते मिळाली. निर्णायक आघाडी मिळत असताना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या आघाडीत मोठी घट झाली. त्यानंतर बजरंग सोनवणे शेवटच्या मतमोजणीत आघाडीवर गेले. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवाने भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. पंकजा मुंडे या भाजपचे मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

26 व्या फेरी अखेर पंकजा मुंडे  यांना 6,27,350 मते मिळाली होती. तर बजरंग सोनवणे यांना 6,17,074 मते मिळाली होती. पंकजा मुंडे यांच्याकडे २६ व्या फेरी अखेर पर्यंत फक्त 10,276 मतांची आघाडी होती. २४ व्या फेरी अखेर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना 5,97,793 मते मिळाली होती. तर महाविकासआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 5,67,332 मते मिळाली होती. पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती.

२० व्या फेरी अखेर मते

बीड लोकसभा मतदारसंघातून 20 व्या फेरी पर्यंत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना 490148 मते तर महाविकासआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 473666 मते मिळाली आहेत. सध्या पंकजा मुंडे आघाडीवर असून त्यांच्याकडे 16482 मतांची आघाडी आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मैदनात होते तर वंचित बहुजनकडून अशोक हिंगे हे निवडणूक लढवत होते.

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे या खासदार होत्या. २०१९ मध्ये प्रीतम मुंडे या जागेवरून विजयी होऊन खासदार झाल्या. त्यांना एकूण ६,७८,१७५ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना ५,०९,८०७ मते मिळाली होती. त्यांचा १,६८,३६८ मतांनी पराभव झाला होता. पण भाजपने यंदा या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांनी संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात

२०१४ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे हे विजयी होऊन खासदार झाले होते. त्यांना एकूण ६,३५,९९५ मते मिळाली होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांना ४,९९,५४१ मते मिळाली होती. त्यांचा १,३६,४५४ मतांनी पराभव झाला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.

२००९ मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपीनाथ मुंडे खासदार झाले होते. त्यांना ५,५३,९९४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) यांना ४,१३,०४२ मते मिळाली होती. त्यांचा १,४०,९५२ मतांनी पराभव झाला होता.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.