गोविंदा होणार शिवसैनिक, कोणत्या गटात प्रवेश करणार?

लाखो दिल की धडकन, 90चा काळ गाजवणारा आणि आजही देशातील कोट्यवधी चाहत्यांचा आवडता अभिनेता गोविंदा लवकरच शिवसैनिक होणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. गोविंदा हिरो राजकारणात एन्ट्री मारण्याची बातमी तशी नवी नाही. पण गोविंदा हिरो शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी नवी आहे. गोविंदा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती समोर येत आहे.

गोविंदा होणार शिवसैनिक, कोणत्या गटात प्रवेश करणार?
गोविंदा होणार शिवसैनिक
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 8:29 PM

राज्यभरात सध्या होळी सणाचा उत्साह आहे. पुढच्या दोन दिवसात होळी आहे. या होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात रंगपंचमीच्या निमित्ताने धुळवड उडवली जाणार आहे. देशभरातील नागरीक विविध रंगांची रंगपंचमी खेळणार आहेत. पण या धुळवडीनंतर देशात राजकीय धुळवड देखील उडताना बघायला मिळणार आहे. कारण देशातील सर्वात मोठी 18वी लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 19 एप्रिलला या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय पक्षांच्या बैठाका सुरु आहेत. कोणत्या मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करावा, प्रचाराचा मुद्दा काय ठेवावा, विरोधकांना चितपट कसं करावं, यासाठी प्रत्येक पक्षात रणनीती आखली जात आहे.

विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांकडून सेलिब्रिटी मंडळींनाही मोठी संधी मिळणार आहे. अनेक नावाजलेल्या सिनेकलाकारांना विविध पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर काही सिनेकलाकार हे विविध पक्षांचे स्टार प्रचारक देखील असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा 90 चा काळ गाजवणारा सर्वात प्रसिद्ध अभिनेता गोविंदा देखील यामध्ये आघाडीवर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत गोविंदा आघाडीवर असणार असला तरी तो आघाडीचा उमेदवार किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही. कारण गोविंदा युती धर्मांचं पालन करणार आहे. त्यामागील कारणही तसं आहे. कारण गोविंदाने महायुतीमधील महत्त्वाच्या असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. तसेच गोविंदा फक्त प्रवेश करणार नाही तर निवडणूकही लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘या’ सेलिब्रिटींच्या नावाची मुंबईत चर्चा

अभिनेता गोविंदाने 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोविंदा उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर आणि राज बब्बर यांचं नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे स्वरा भास्कर यांनी दिल्लीत काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांची भेट घेतल्याचीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिंदे गटाचा प्रचार सेलिब्रेटी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेसाठी बॅालिवूड, टॅालिवूड आणि अनेक मराठी सिनेकलाकार प्रचार करणार आहेत. ⁠शिवसेनेने बॅालिवूड सिनेकलाकारांची स्टार प्रचारक यादी तयार केली आहे. हे सिने कलाकार राज्यभरात शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. मतदारसंघ निहाय भाषिक आधारावर त्या-त्या मतदारसंघात हे सिने कलाकार प्रचार करतील. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच अभिनेता गोविंदाने ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. ⁠गोविंदा मुंबईत शिवसेनेचा स्टार प्रचारक असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ⁠असे अनेक सिने कलाकार आहेत ज्यांच्याशी शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांची भेट घेतली आहे

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.