Lok Sabha Election Results 2024: कंगना राणौत आघाडीवर तर अरुण गोविल पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल समोर यायला सुरुवात झाली आहे. यानुसार अभिनेत्री कंगना राणौत आघाडीवर तर अभिनेते अरुण गोविल हे पिछाडीवर आहेत.

Lok Sabha Election Results 2024: कंगना राणौत आघाडीवर तर अरुण गोविल पिछाडीवर
Arun Govil and Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 9:57 AM

यंदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बरेच सेलिब्रिटी उतरले आहेत. कंगना राणौत, अरुण गोविल यांच्या मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, तर अरुण गोविल हे मेरठ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. याशिवाय हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, पवन सिंह, निरहुआ यांच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. हेमा मालिनी या मथुरेतून, शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून, मनोज तिवारी हे उत्तर पूर्व दिल्लीतून, रवी किशन गोरखपूरमधून, दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आजमगढमधून, पवन सिंह हे काराकाटमधून आणि मल्याळम स्टार सुरेश गोपी केरळमधून त्रिस्सूर इथून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

मथुरा मतदारसंघातून भाजपच्या हेमा मालिनी या 12100 मतांनी आघाडीवर आहेत. त्या मथुरेतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर रवी किशन हे गोरखपूरमधून 8090 मतांनी आघाडीवर आहेत. मंडी या मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत पिछाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. ‘रामायण’ या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल हे उत्तरप्रदेशमधील मेरठ या मतदारसंघातून 6 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

Lok Sabha Election Results 2024 LIVE : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत ही सुरुवातीला आघाडीवर होती. मात्र काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्याकडून तिला चांगलीच टक्कर मिळत आहे. त्यामुळे कंगना पिछाडीवर गेली आहे. भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी हे सुरुवातीच्या कलांनुसार आघाडीवर आहेत. ते उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे कन्हैय्या कुमार आहेत. गोरखपूरमधून रवी किशन आघाडीवर आहेत. त्यांची टक्कर समाजवादी पार्टीच्या काजल निषाद यांच्याशी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.